नवरीनं भर पार्टीत वाजवलं 'उत्तेजक गाणं', नवरदेवानं लग्न करताच दिला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 03:03 PM2022-01-12T15:03:08+5:302022-01-12T15:05:37+5:30

हे गाणे ऐकताच तेथे उपस्थित लोक अवाक झाले. वरालाही हे सीरियन गाणे आवडले नाही. यातच त्याने नवरीला या गाण्यावर नाचतनाही पाहिले आणि त्याचा आणखीनच संताप झाला.

Iraq Groom divorces bride just after wedding for playing provocative song in baghdad | नवरीनं भर पार्टीत वाजवलं 'उत्तेजक गाणं', नवरदेवानं लग्न करताच दिला तलाक

नवरीनं भर पार्टीत वाजवलं 'उत्तेजक गाणं', नवरदेवानं लग्न करताच दिला तलाक

googlenewsNext

केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देशांतून लग्नासंर्भातील वेगवेगळे तथा आश्चर्य वाटावे असे किस्से समोर येत असतात आणि व्हायरलही होतात. कधी कधी ही प्रकरणे एवढी गमतीशीर असतात, तर कधी कधी गंभीर घटनाही समोर येतात. बगदादमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे. तेथे लग्न होताच नवरदेवाने नवरीला तलाक दिला. वधूचा दोष एवढाच होता, की तिने लग्नानंतरच्या पार्टीत एक गाणे वाजवले आणि ते गाणे नवरदेवाला आवडले नाही.

ही घटना इराकमधील बगदाद येथील आहे. 'गल्फ न्यूज'ने दिलेल्या एका वृत्तानुसार, येथे एक विवाह सोहळा पार पडला. यावेळी वधू-वरांचे अनेक नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान, वधू डीजे वाजत असलेल्या ठिकाणी पोहोचली आणि तिने एक गाणे वाजवले. वृत्तानुसार, तिने एक सीरियन गाणे वाजवले, ते गाणे खूपच 'उत्तेजक' असल्याचे बोलले जात आहे.

हे गाणे ऐकताच तेथे उपस्थित लोक अवाक झाले. वरालाही हे सीरियन गाणे आवडले नाही. यातच त्याने नवरीला या गाण्यावर नाचतनाही पाहिले आणि त्याचा आणखीनच संताप झाला. सुरुवातीला तेथील काही उपस्थित लोकांनी तिला थांबवले. पण नंतर वराचा आणि वधूचा जबरदस्त वाद झाला. हा वाद एवढा वाढला, की वराने वधूला थेट तलाकच देऊन टाकला.

संबंधित वृत्तात या गाण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. हे 'मेसायतारा' नावाचे सीरियन गाणे होते, असे सांगण्यात येते. या गाण्याचा अर्थ 'आय अॅम डोमिनंट' अथवा 'आय विल कंट्रोल यू' असा आहे. या गाण्यामुळे वर एवढा नाराज झाला की, त्याने लग्ना मंडपातच तलाक घेण्याचा निर्णय घेतला. सध्या हा तलाक संपूर्ण जगात चर्चेचा विषय झाला आहे. हा 2022 मधील सर्वात फास्टेस्ट तलाक असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Iraq Groom divorces bride just after wedding for playing provocative song in baghdad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.