कोण कल्पना करु शकेल इराकमध्ये कोरोना जनजागृतीसाठी विनोदाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 02:56 PM2020-05-11T14:56:57+5:302020-05-11T14:57:04+5:30
काहींनी व्हिडीओ केले, काहींनी चित्र काढली आणि लोकांना आवाहन केलं की घरात बसा.
इराक मधलं की डोळ्यासमोर काय येतं? वाचलेल्या बातम्या, त्यात फुटणारे बॉम्ब, अस्वस्थ, युद्धग्रस्त देश.
कोरोना सगळ्या जगात पोहोचला तसा इराकमध्येही पोहोचलाच.
इराकमध्ये 2529 लोकांना संसर्ग झाला असून 102 मृत्यू झाले आहेत.
इराकमध्ये आधीच आरोग्यव्यवस्था आजारी असताना आता हे नवीन संकट पोहोचलं. त्याविषयी जनजागृती तर करायला हवीच.
मात्र कोण कल्पना करु शकेल की कोरोना जनजागृतीसाठी विनोदाची, पॅरडीची मदत घेण्यात आली.
इराकच्या बसरा शहरातली ही गोष्ट.
सा:या अरब विश्वातच बाब अल हारा ही मालिका मोठी लोकप्रिय आहे. युटय़ूबवर तिचे 1क् सिझन झाले आहेत.
ती फार आवडीने लोक पाहतात.
त्याचीच पॅरडी करुन विनोदनिर्मिती करत कोरोना जनजागृती करावी, लोकांना सांगावं की शारीरिक दूरी राखा, घरात राहा, स्वच्छता पाळा, म्हणून या मालिकेवर ही पॅरडी बेतण्यात आली.
ती ही अनेक लोकांनी आनंदानं पाहिली आणि दादही दिली.
काहींनी व्हिडीओ केले, काहींनी चित्र काढली आणि लोकांना आवाहन केलं की घरात बसा.
मार्चपासून इराकमध्येही लॉकडाउन आहे. मात्र अलिकडे सायंकाळी काही काळ आणि सुटीच्या दिवशी कर्फ्यू उठवण्यात येतो.
मात्र त्यावेळी लोक खरेदीसाठी तुंबळ गर्दी करतात.
कोरोना हा टिंगल करण्याचा विषय नाही, तो गांभिर्याने घ्या, सजग रहा असं म्हणत अनेक तरुण मुलांनी व्हिडीओ, चित्र यातून आवाहन केलं.
बाब अल हरा या पॅरडीचा दिग्दर्शक मुस्तफा अल करखी, 29 वर्षाचा तरुण आहे. तो सांगतो, आपण लोकांर्पयत माहिती पोहचवू शकतो, ती माहिती ते पाहतील, ऐकतील अशा रुपात द्यायला हवी. म्हणून हा पॅरडीचा फॉर्म आम्ही निवडला.
आपण आपली काळजी घ्या, हेच आम्ही लोकांना सांगत आहोत.