इराकी सैन्य तिक्रीतमध्ये घुसले
By Admin | Published: March 11, 2015 11:42 PM2015-03-11T23:42:03+5:302015-03-11T23:42:03+5:30
इराकी सैनिक व खासगी लष्कराचे सदस्य (शिया मिलिशिया) बुधवारी इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या ताब्यातील तिक्रीत शहरामध्ये घुसले.
बगदाद : इराकी सैनिक व खासगी लष्कराचे सदस्य (शिया मिलिशिया) बुधवारी इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या ताब्यातील तिक्रीत शहरामध्ये घुसले. याच लढाईत इराकी सैनिकांचा इसिसविरुद्ध कस लागणार आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, इराकी सैनिक क्वादिसियामार्गे तिक्रीतमध्ये घुसले. सलाउद्दीन प्रांताची राजधानी असलेले हे शहर बगदादपासून १३० कि.मी. अंतरावर आहे. इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या मोठ्या शहरांत त्याचा समावेश होतो. बगदाद ते मोसूल मार्गावर असल्याने हे शहर व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून त्यावर ताबा मिळविल्याने इराकी सैनिकांना मोसूलकडे मोर्चा वळविण्यास मोठी मदत मिळणार आहे. मोसूल पुन्हा ताब्यात घेण्यासाठीची संयुक्त लष्करी मोहीम एप्रिल किंवा मेमध्ये सुरू होईल, असे अमेरिकी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)