सुन्नी बंडखोरांविरुद्ध इराकी लष्कराचा संघर्ष
By admin | Published: July 4, 2014 05:17 AM2014-07-04T05:17:29+5:302014-07-04T05:17:29+5:30
अमेरिकी अधिकारी देशातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधत असताना दुसरीकडे इराकी सैनिक सुन्नी बंडखोरांसोबतची लष्करी कोंडी फोडण्यासाठी गुरुवारी संघर्ष करत होते
बगदाद : इराकमधील राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी एकीकडे अमेरिकी अधिकारी देशातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधत असताना दुसरीकडे इराकी सैनिक सुन्नी बंडखोरांसोबतची लष्करी कोंडी फोडण्यासाठी गुरुवारी संघर्ष करत होते.
अमेरिकेने राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी इराकी आणि प्रादेशिक नेत्यांशी स्वतंत्र चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला आणि उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इराकी संसदेचे माजी सभापती ओसामा अल नुजाईफी यांच्याशी चर्चा केली. नुजाईफी एक प्रमुख सुन्नी नेते आहेत. बिडेन आणि नुजाईफी देशाला एकजूट ठेवण्यासाठी नव्या सक्षम सरकारची लवकरात लवकर स्थापना करण्यास सहमत झाले. दरम्यान, परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी कुर्द नेते मसूद बरजानी यांना दुरध्वनी केला़ . (वृत्तसंस्था)