इराकची आशा बेलारुस, रशियाच्या विमानांवर
By Admin | Published: June 28, 2014 01:26 AM2014-06-28T01:26:00+5:302014-06-28T01:26:00+5:30
इराकचे पंतप्रधान नुरी अल मलिकी यांना 2 ते 3 दिवसांत रशिया व बेलारूसकडून घेतलेली लढाऊ विमाने ताब्यात येतील, अशी आशा वाटत आहे.
>बगदाद : सुन्नी बंडखोरांचा इराकमध्ये गोंधळ चालूच असून, इराकचे पंतप्रधान नुरी अल मलिकी यांना 2 ते 3 दिवसांत रशिया व बेलारूसकडून घेतलेली लढाऊ विमाने ताब्यात येतील, अशी आशा वाटत आहे. ही विमाने ताब्यात आल्यास सुन्नी दहशतवाद्यांचा खात्मा सहजपणो केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बीबीसीच्या अरेबिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मलिकी बोलत होते. अमेरिकेकडून खरेदी केलेली एफ 16 विमाने इराकला मिळालेली नाहीत, त्यामुळे इराकने रशिया व बेलारूसकडून वापरलेली लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. परमेश्वराची इच्छा असेल तर ही लढाऊ विमाने एक आठवडय़ात आमच्या हातात येतील व दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त होतील असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने दहशतवाद्यांवर हवाई हल्ले करावेत अशी मागणी मलिकी यांनी केली होती; पण अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ती नाकारली असून, त्याऐवजी विशेष प्रशिक्षण मिळालेले 3क्क् सैनिक इराकी फौजेला मदत करण्यासाठी पाठवले आहेत. इराकने अमेरिकेशी जेट विमाने खरेदी करण्याचा करार केला; पण त्यात इराकची फसवणूक झाल्याचे मलिकी यांनी या मुलाखतीत मान्य केले. आम्ही आधीच ब्रिटन, रशिया, फ्रान्स यांच्याकडून लढाऊ विमाने खरेदी करायला हवी होती. आमच्याकडे लढाऊ विमाने असती तर आतार्पयत जे झाले ते झालेच नसते असे मलिकी यांनी म्हटले आहे.
आयएसआयएलच्या हत्याकांडाचे स्थळ मिळाले