इराकमधील कुर्द प्रांतही फुटण्याच्या तयारीत
By admin | Published: June 25, 2014 02:43 AM2014-06-25T02:43:12+5:302014-06-25T02:43:12+5:30
इराक-अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी इराकच्या कुर्द भागातील दौ:यावर असून, इराक तुटण्यापासून वाचवा असे आवाहन त्यांनी कुर्द नेत्यांना केले आहे.
Next
>अर्बिल : इराक-अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी इराकच्या कुर्द भागातील दौ:यावर असून, इराक तुटण्यापासून वाचवा असे आवाहन त्यांनी कुर्द नेत्यांना केले आहे. सुन्नी बंडखोरांची आगेकूच चालूच असून, बंडखोरांनी आज जॉर्डनच्या सीमेवरील गावेही आपल्या ताब्यात घेतली आहेत.
इराकी सैनिक बगदादजवळचा देशातील सर्वात मोठा तेल प्रकल्प वाचविण्याचा प्रयत्न अजूनही करत आहेत. गेल्या दोन आठवडय़ांपासून हा संघर्ष चालू आहे. सुन्नी बंडखोरांची दहशत वाढतच असल्याच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी मध्यपूव्रेच्या दौ:यावर आले असून, इराकच्या शेजारी देशांना इराक वाचविण्याचे आवाहन करत आहेत. इराक फुटू द्यायचा नसेल तर कुर्द नागरिकांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे अमेरिकन अधिका:यांना वाटते. ते जर मुख्य प्रवाहातून बाजुला पडले तर इराकमध्ये नकारार्थी प्रवाह अधिक बळकट होतील व देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. आम्हाला आता नवा इराक हवा आहे असे कुर्द अध्यक्ष मसूद बङरनी यांनी केरी यांना सांगितले. इराकमध्ये 5क् लाख कुर्द असून, त्यांचे वेगळे साम्राज्य आहे. 2क्क्3 साली सद्दाम हुसेनच्या पाडावानंतर त्यांनी आपला भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. सुन्नी बंडखोरांनी उत्तर इराकमधील मोसूल शहर ताब्यात घेतल्यानंतर कुर्द लोकांनी किकरुक हे शहर ताब्यात घेतले आहे. ही आपल्या भागाची राजधानी बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे कुर्द इराकचा भाग म्हणून राहणार नाहीत हे स्पष्ट आहे. कुर्द नेते कधीही स्वातंत्र्याची घोषणा करू शकतात. (वृत्तसंस्था)
4हुकूमशहा सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावणा:या न्यायाधीशाची सुन्नी बंडखोरांनी हत्या केली आहे. कुर्दीश न्यायाधीश रौफ अब्दुल रहमान यांनी 2क्क्6 मध्ये हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, इराक सरकारने या वृत्तास दुजोरा दिला नाही.