इस्रायलची हेरगिरी करतोय चीन? पाठवले संशयास्पद गिफ्ट, संरक्षण संस्था अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 09:09 PM2022-04-12T21:09:55+5:302022-04-12T21:10:36+5:30
चीनने इस्रायलच्या एका मंत्र्याला दिलेल्या भेट वस्तूमध्ये बगिंग डिव्हाईस लपवले होते का? असा संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता ...
चीननेइस्रायलच्या एका मंत्र्याला दिलेल्या भेट वस्तूमध्ये बगिंग डिव्हाईस लपवले होते का? असा संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता इस्रायलने तपास सुरू केला आहे. हारेट्झच्या एका वृत्तानुसार, चीनने एका इस्रायली मंत्र्याला भेट म्हणून दिलेल्या थर्मल कपमध्ये बगिंग डिव्हाईस लपवले होते का? यासंदर्भात इस्रायली शिन बेट सुरक्षा सेवा चौकशी करत आहे.
सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयालाही कप पाठवणार चीन -
हा कप चीनी दूतावासाने सायंस, टेक्नॉलॉजी आणि स्पेसमंत्री ओरित फरकश-हकोहेन यांना पाठवला होता. यासंदर्भात, बोलताना घटनेची चौकशी होत असल्याचे संरक्षण संस्थेने म्हटले आहे. यातच, सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयानेही, आपल्यालादेखील चिनी दूतावासाकडून एक संदेश आला असून यात एक कप मंगळवारी येण्याची शक्यता असल्याचे म्हणण्यात आले आहे, असे सांगितले आहे.
बगिंग डिव्हाइसचा संशय का?
जेव्हा तपासणीदरम्यान अलार्म वाजला तेव्हा या गिफ्टसंदर्भात सुरक्षा गार्ड्सना संशय आला. यानंतर, पन्हा तपासणी झाली आणि हे संशयास्पद गिफ्ट शिन बेटकडे पाठवण्यात आले. या घटनेनंतर शिन बेटने या कपांची माहिती मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांसोबत संपर्क साधला. महत्वाचे म्हणजे, इतर मंत्रालय कार्यालयांनी, आपल्याला चिनी दुतावासाकडून, अशा प्रकारची कुठलीही भेट वस्तू आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.