सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले, मुदतीआधीच ISI प्रमुखाची होणार हकालपट्टी
By admin | Published: October 8, 2016 02:35 PM2016-10-08T14:35:08+5:302016-10-08T15:39:50+5:30
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर धाबे दणालेल्या पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर अस्वस्थतता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ८ - भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर धाबे दणालेल्या पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर अस्वस्थता पसरली असून, लवकरच तिथे आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना पदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे.
पुढच्या काही आठवडयात हा बदल होऊ शकतो असे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असून, तिथे सरकारपेक्षाही आयएसआयला बलाढय समजले जाते. नोव्हेंबर २०१४ मध्ये रिझवान अख्तर यांनी आयएसआयच्या प्रमुखपदाचा पदभार संभाळला होता.
आयएसआय प्रमुखपदावर नियुक्ती साधारण तीन वर्षांसाठी होते. पण रिझवान अख्तर यांना तीन वर्ष पूर्ण करण्याआधीच हटवण्यात येणार आहे. कराचीचे कॉपर्स कमांडर लेफ्टनंट जनरल नावीद मुख्तार त्यांची जागा घेण्याची दाट शक्यता आहे.