ISI ने २.५ कोटी डॉलर्सच्या मोबदल्यात दिली ओसामा बिन लादेनची माहिती ?

By admin | Published: May 12, 2015 10:34 AM2015-05-12T10:34:09+5:302015-05-12T13:07:22+5:30

कुख्यात दहशतवादी व अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या माजी अधिका-यानेच अमेरिकेला दिली होती अशी माहिती समोर आली आहे.

ISI gave Osama bin Laden information for $ 25 million? | ISI ने २.५ कोटी डॉलर्सच्या मोबदल्यात दिली ओसामा बिन लादेनची माहिती ?

ISI ने २.५ कोटी डॉलर्सच्या मोबदल्यात दिली ओसामा बिन लादेनची माहिती ?

Next

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. १२ - पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या माजी अधिका-याने तब्बल अडीच कोटी डॉलर्सच्या मोबदल्यात अमेरिकेला ओसामा बिन लादेनची माहिती पुरवली असा गौप्यस्फोट अमेरिकेच्या पत्रकाराने केला आहे.  अमेरिकेने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. 

अमेरिकेतील शोध पत्रकार व लेखक सेमर हर्श यांनी पाकिस्तानच्या वृत्तपत्राशी बोलताना ओसामा बिन लादेन याच्यावरील कारवाईची महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. 'ऑगस्ट २०१० मध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या माजी अधिका-याने इस्लामाबाद येथील अमेरिकी दुतावासाशी संपर्क साधला होता. या अधिका-याने अमेरिकेला ओसामाच्या ठावठिकाण्याविषयीची माहिती द्यायची तयारी दर्शवली व या मोबदल्यात ओसामावर पारितोषिक म्हणून ठेवलेले २.५ कोटी डॉलर्स द्यावे असा प्रस्ताव मांडला होता. अमेरिकेने हा प्रस्ताव स्वीकारला व त्यानंतर ओसामावर कारवाई करण्याची योजना आखली गेली असा दावाही हर्श यांनी केला आहे. ऑपरेशन ओसामाची पाकिस्तानमधील सैन्य व गुप्तचर यंत्रणेला माहिती नव्हती असा दावा अमेरिकेने केला होता. मात्र हर्श यांनी अमेरिकेच्या या दाव्याची पोलखोल केली आहे. अमेरिकेने ओसामावरील कारवाईसंदर्भात पाकिस्तान सैन्य वव गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला होता असे हर्श यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी यंत्रणा आयएसआयने ओसामाला नजरकैदेत ठेवले होते व सौदी अरेबियालाही याची माहिती होती असेही या वृत्तात म्हटले आहे. 

Web Title: ISI gave Osama bin Laden information for $ 25 million?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.