भारतीय राजदूताला आयएसआयच्या धमक्या; 'ते' दोघे पकडले गेल्यानं पाकिस्तानचा जळफळाट?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 10:12 PM2020-06-04T22:12:41+5:302020-06-04T22:14:19+5:30

भारतीय राजदूताच्या घराबाहेर आयएसआयकडून माणसं तैनात

Isi Threatening Indian Diplomat Deployed People Outside Islamabad Home | भारतीय राजदूताला आयएसआयच्या धमक्या; 'ते' दोघे पकडले गेल्यानं पाकिस्तानचा जळफळाट?

भारतीय राजदूताला आयएसआयच्या धमक्या; 'ते' दोघे पकडले गेल्यानं पाकिस्तानचा जळफळाट?

Next

इस्लामाबाद: एकीकडे संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना दुसरीकडे पाकिस्तानभारताविरोधात वेगळीच कटकारस्थानं रचत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी दुतावासात काम करणारे दोन अधिकारी हेरगिरी करताना रंगेहात पकडले गेले. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांना तातडीनं देशातून बाहेर काढण्यात आलं. यामुळे चरफडत असलेल्या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं आता इस्लामाबादमधील भारतीय राजदूताला त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

इस्लामाबादमध्ये वास्तव्यास असलेले भारताचे वरिष्ठ राजदूत गौरव अहुवालिया यांच्या घराबाहेर आयएसआयनं कार आणि दुचाकीसह काही जणांना तैनात केलं आहे. त्यांच्याकडून अहुवालिया यांना धमक्या दिल्या जात आहेत. सर्व देशांच्या राजदूतांना व्हिएन्ना कराराच्या अंतर्गत सुरक्षा दिली जाते. मात्र इस्लामाबादमधील अतिसुरक्षित क्षेत्रात राहणाऱ्या अहुवालिया यांना धमक्या दिल्या जात असल्यानं भारतीय राजदूतांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

पाकिस्तानमध्ये सेवा बजावणारे भारतीय राजदूत गौरव अहुवालिया यांनी याआधीही त्रास देण्यात आला आहे. कित्येकदा आयएसआयच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी आणि कारच्या माध्यमातून अहुवालिया यांचा पाठलाग केला आहे. याबद्दल इस्लामाबादमधील भारतीय दुतावासानं चिंता व्यक्त केली होती. 

काही दिवसांपूर्वीच दिल्लीतल्या पाकिस्तानी दूतावासात काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना (आबिद हुसेन आणि मोहम्मद ताहिर) भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी हेरगिरी करताना रंगेहात पकडलं. त्यानंतर त्यांना देशातून बाहेर काढण्यात आलं. याचाच बदला घेण्यासाठी आयएसआय भारतीय राजदूताला त्रास देत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पंतप्रधान मोदींकडून मास्टरस्ट्रोक्सचा चौकार; भारताच्या हालचाली पाहून चिनी ड्रॅगन हैराण

चीनला धडा शिकवण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लान; समुद्रात ड्रॅगनला भारी पडणार

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमानं

कोरोनाच्या संकटात अमेरिका मैत्री निभावणार; भारताला 'ही' मदत करणार

Web Title: Isi Threatening Indian Diplomat Deployed People Outside Islamabad Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.