मँचेस्टरच्या दहशतवादी हल्ल्याची "इसिस"नं स्वीकारली जबाबदारी

By Admin | Published: May 23, 2017 06:51 PM2017-05-23T18:51:20+5:302017-05-23T18:51:20+5:30

मँचेस्टर अरिनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी "इसिस" या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

"ISIS" accepted the responsibility of Manchester terrorist attack | मँचेस्टरच्या दहशतवादी हल्ल्याची "इसिस"नं स्वीकारली जबाबदारी

मँचेस्टरच्या दहशतवादी हल्ल्याची "इसिस"नं स्वीकारली जबाबदारी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - मँचेस्टर अरिनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी "इसिस" या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आमच्या एका "सैनिका"ने हा हल्ला केल्याचं इसिसनं जाहीर केलं आहे. मँचेस्टरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा भीषण हल्ला झाला आहे, असं वक्तव्य ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केलं आहे.

मँचेस्टर अरिनामधील दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानंतर इसिसच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. याचा एक व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. "इराकमधील हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला", असा दावाही केला जात आहे. मवारी रात्री इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात झालेल्या अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर  59 जण जखमी झाले. या स्फोटात मुत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
हल्ल्याबाबत माहिती देताना ग्रेटर मँचेस्टर पोलीस दलाचे प्रमुख इयान हापकिन्स यांनी या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. मात्र हा या हल्लेखोराने एकट्यानेच हा हल्ला घडवून आणला की त्याचामागे कुठल्या प्रबळ दहशतवादी संघटनेचा हात आहे, याबाबत पोलिसांना अद्याप विश्वसनीय माहिती मिळालेली नाही. हाफकिन्स म्हणाले, "मँचेस्टर येथील कार्यक्रमात स्फोट घडवणारा हल्लेखोर एकटाच होता. त्याच्याजवळ आयइडी स्फोटके होती. कार्यक्रम संपल्यावर त्याने त्यांचा स्फोट घडवून आणला. या स्फोटादरम्यान तोसुद्धा  ठार झाला. " ग्रेटर मँचेस्टरमध्ये झालेला आतापर्यंतचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. यापुढे अशा प्रकारचा प्रसंग येणार नाही अशी अपेक्षा करू या.  आरियाना ग्रँड हिच्या संगीत कार्यक्रमासाठी अनेक कुटुंबे, विशेष करून तरुण वर्ग आला होता. या हल्ल्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला. 
 
दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ब्रिटिश सरकारने आपातकालीन बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती डाऊनिंग स्ट्रीटने प्रसिद्ध केली आहे. काल रात्री झालेला हल्ला हा 7 जुलै 2005 रोजी लंडनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे.  

Web Title: "ISIS" accepted the responsibility of Manchester terrorist attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.