मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानं ISIचे एजंट बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 05:29 PM2016-11-16T17:29:01+5:302016-11-16T17:44:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तानातील ISIचे एजंटही अक्षरशः बेरोजगार झाले

ISI's agent unemployed in the decision to block Modi | मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानं ISIचे एजंट बेरोजगार

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानं ISIचे एजंट बेरोजगार

Next

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात काळा पैसा बाळगणा-यांची भंबेरी उडाली असतानाच तिकडे पाकिस्तानातील ISI एजंटही अक्षरशः बेरोजगार झाले आहेत. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या आयएसआयच्या एजंट्सची झोप उडाली आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI बनावट नोटांच्या माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था डळमळीत करण्याच्या प्रयत्नात होती. या बनावट नोटा भारतात पाठवण्यासाठी ISIला पाकिस्तानातल्या एक निवृत्त ब्रिगेडिअर मदतही मिळत होती. मात्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर हा निवृत्त ब्रिगेडिअरही बेरोजगार झाला आहे.

फर्स्ट पोस्टच्या वृत्तानुसार, पाकिस्तान बनावट नोटा भारत पेरण्यासाठी 'आरबीआय' या कोडवर्डचा वापर करत असे. पाकिस्तानच्या प्रिटिंग प्रेसमध्ये बनवलेल्या बनावट नोटा लष्करातून निवृत्त झालेला ब्रिगेडिअर लाला भारतात पोहोचवण्याचं काम करत असून, 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी आल्यानंतर पाकिस्तानात कोणीही लालाकडून या नोटा घ्यायला तयार नाही. रावळपिंडीच्या मुनी रोडवर बनावट नोटांचे अनेक बंडल टाकून देण्यात आले आहेत.

भारतीय गुप्तचर विभाग आयबीच्या माहितीनुसार, आयएसआयनं फंडिंग गोठल्यानं रावळपिंडीतले एक हेडक्वॉर्टरही बंद केले आहे. नोटाबंदीनंतर खालिस्तान जिंदाबाद फोर्स आणि इंडियन मुजाहिद्दीनसारख्या दहशतवादी संघटनांचे फंडिंग बंद झालं आहे. त्यासंदर्भात त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी बोलणी केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे आयएसआय भारतात मोठ्या प्रमाणात मोठ्या बनावट नोटा पाठवत असल्याचं उघड झालं आहे.

Web Title: ISI's agent unemployed in the decision to block Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.