‘इसिस’चा युरोपवर केव्हाही हल्ला?
By admin | Published: February 22, 2016 03:36 AM2016-02-22T03:36:44+5:302016-02-22T03:36:44+5:30
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे पाच हजार अतिरेकी युरोपात लपून बसल्याची आणि कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची भीती युरोपियन पोलीस अधिकाऱ्यांच्या
पॅरिस : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे पाच हजार अतिरेकी युरोपात लपून बसल्याची आणि कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची भीती युरोपियन पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमुखाने वर्तविली आहे.
‘द इंडिपेंडट’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. युरोपियन संघात कायदा आणि सुव्यवस्थेची निगराणी करणाऱ्या या संस्थेचे संचालक रॉब वेनराईट यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, विविध दहशतवादी छावण्यांत प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व जण परत आले आहेत आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यांप्रमाणे हे हल्ले होऊ शकतात. पॅरिसमधील या हल्ल्यात १३० जण ठार झाले होते.
या वृत्तपत्राशी बोलताना रॉब म्हणाले की, गेल्या एक दशकापासून युरोप दहशतवादी हल्ल्यांशी संघर्ष करीत आहे. इसिस किंवा अन्य कोणत्याही दहशतवादी संघटना कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतात, असे प्रत्येकालाच वाटते. (वृत्तसंस्था)