VIDEO- जिवंत आहे इसिसचा बगदादी?, पाच वर्षांनी व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 09:50 AM2019-04-30T09:50:45+5:302019-04-30T09:52:20+5:30
कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी जिवंत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
बगदादः कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी जिवंत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पाच वर्षांनंतर बगदादीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो काही साथीदारांसह जिहादवर बोलताना दिसत आहे. पण या व्हिडीओची सत्यता पडताळली जात आहे. या व्हिडीओमध्ये बगदादी पूर्व सीरियासंदर्भात बोलताना दिसतोय.
गेल्या महिन्यात बागोजवरचं अधिपत्य लढाईत इसिसनं गमावलं होतं. इसिसचा हा शेवटचा गड होता. व्हिडीओत बगदादी म्हणतोय, बागोजची लढाई संपली आहे. त्याच्या समोर तीन माणसं बसली आहेत, त्यांचा चेहरा झाकलेला आहे. तत्पूर्वी ऑगस्ट 2018मध्येही इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीची एक कथित ऑडियो क्लिप समोर आली होती. ज्यात त्यानं मुस्लिम समुदायाला जिहादसाठी लढण्याचं आवाहन केल्याचं ऐकायला मिळालं होतं.
Bagdadi is Alive with a AKS-74U on his side look healthy,talks to aides slowly but in clear and coherent manner..big challenge to @realDonaldTrump wrong in withdrawing troops from Syria.after Sri Lanka ...what next Afghanistan???#SriLankaTerrorAttack#Kerala#Afghanistan@POTUSpic.twitter.com/bOHXolIuc8
— Kanwaljeet Singh (@kjsingh001) April 29, 2019
त्यावेळी बगदादीनं टेलिग्राम संदेशाच्या माध्यमातून पश्चिमी देशांवर हल्ला करण्याचंही आवाहन केलं होतं. बगदादीचा हा कथित व्हिडीओ बाहेर आला, तोपर्यंत इराक आणि सीरियातल्या जास्त करून भागातील इसिसच्या दहशतवाद्यांना पळवून लावलं होतं. सप्टेंबर 2017नंतर इसिसच्या म्होरक्याचं पहिलं रेकॉर्डिंग समोर आलं होतं. इसिसनं 2014मध्ये सीरिया आणि इराकचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. तसेच स्वतःला या भागातील खलिफा घोषित केलं होतं. परंतु आता त्यांना या दोन्ही देशांतून पळवून लावण्यात आलं आहे.