इसिसचा अर्थप्रमुख अबू सालेह हवाई हल्ल्यात ठार
By admin | Published: December 11, 2015 09:23 AM2015-12-11T09:23:14+5:302015-12-11T09:31:21+5:30
'इसिस' या कुख्यात दहशतवादी संघटनेची आर्थिक बाजू सांभाळणारा प्रमुख अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास अमेरिकेने दुजोरा दिला.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ११ - 'इसिस' या कुख्यात दहशतवादी संघटनेची आर्थिक बाजू सांभाळणारा प्रमुख अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तास अमेरिकेने दुजोरा दिला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात इसिसचा सालेह ठार झाला, असे अमेरिकी लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
'इसिस'चे आर्थिक व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी असलेला सालेह हा मोजक्या लोकांपैकी असून तो सर्वात ज्येष्ठ व अनुभवी माणूस होता असे त्याचे वर्णन अमेरिकेच्या लष्कराचे प्रवक्ते कर्नल स्टीव्ह वॉरेन यांनी केले.
४२ वर्षीय अबू सालेहचे मूळ नाव मुअफ्फक मुस्तफा मुहम्मदअल-कर्मुश असे असून तो मूळचा इराकचा होता, अशी माहिती समोर आली आहे. या हवाई हल्ल्यात अबू सालेहसह त्याचे दोन सहकारीही ठार झाले. ते दोघेही इसिसच्या आर्थिक विभागाचेच काम पाहत होते.