गुरुद्वारावर ISIS चा मोठा हल्ला; 27 शीखांचा गोळीबारात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 03:19 PM2020-03-26T15:19:15+5:302020-03-26T15:38:35+5:30
अफगाण वृत्तसंस्थांनुसार हा हल्ला तब्बल सहा तास सुरु होता. या हल्ला चार जणांनी घडविला. या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएसने घेतली.
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल ISIS च्या दहशतवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्याने हादरली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गुरुद्वारावर आत्मघातकी दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान आज पुन्हा शीखांच्या निवासी कॅम्पजवळ बॉम्बहल्ला करण्यात आला असून भारतीय दूतावासाने नाराजी व्यक्त केली आहे.
हा हल्ला या देशांतील अल्पसंख्यांकांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून दु:ख व्यक्त केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही निषेध व्यक्त करताना कोरोना व्हायरस पसरलेला असताना अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. यामुळे हल्लेखोरांची सैतानी मानसिकता उघड होत आहे.
अफगाण वृत्तसंस्थांनुसार हा हल्ला तब्बल सहा तास सुरु होता. या हल्ला चार जणांनी घडविला. या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएसने घेतली. याआधीही आयएसआयएसने शीख समुदायावर हल्ले केलेले आहेत. घटनास्थळावरील फोटोंवरून तेथील भीषणतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. पोलिसांनी सांगितले की, गुरुद्वारातून जवळपास ११ लहान मुलांना वाचविण्यात आले. सुरक्षा दलांनी जखमींना स्ट्रेचरवरून ह़ॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी हॉस्पिटबाहेर नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. हल्ल्यावेळी क्रूड बॉम्बचाही वापर करण्यात आला होता.
हल्ल्यावेळी गुरुद्वाऱ्यामध्ये १५० च्या आसपास भाविक आले होते. हा हल्ला मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.४५ ला करण्यात आला. यामध्ये 27 जण ठार झाले आहेत. या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले असून यामुळे जवळपास ८० जण वाचले आहेत.
Our Embassy has been in touch with Kabul security authorities. I have asked them to ensure adequate security onsite as well as the safe return of families to their homes thereafter: EAM S Jaishankar https://t.co/IjsmOF1kF6
— ANI (@ANI) March 26, 2020
चालता चालता चक्कर येऊन पडला; कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यावरच तडफडला
वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी
ISIS बरळली; म्हणाली, 'मूर्तीपूजा करणाऱ्या देशांना अल्लाने उत्तर दिले'
शाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटक