सौदीतील इसिसचे जाळे उद्ध्वस्त : ४३१ जेरबंद
By Admin | Published: July 19, 2015 11:45 PM2015-07-19T23:45:59+5:302015-07-19T23:45:59+5:30
सौदी अरेबियात इस्लामिक स्टेटस्चे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले असून, या संघटनेच्या ४३१ सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
रियाध : सौदी अरेबियात इस्लामिक स्टेटस्चे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले असून, या संघटनेच्या ४३१ सदस्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. हे सदस्य इसिस वा दाएश संघटनेसाठी काम करीत असल्याचा संशय होता व काही महिन्यांपासून त्यांच्यावर लक्ष होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या सदस्यांना अटक झाल्यामुळे मशिदी व धार्मिक ठिकाणी हल्ला करण्याचा त्यांचा कट उधळून लावला असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी इसिसने एका मशिदीवर हल्ला केला होता. त्यानंतर सौदी अधिकाऱ्यांनी मोठी मोहीम उघडून या ४३१ दहशतवाद्यांना अटक केली.
ब्रिटनची मदत
इसिसने स्थापन केलेले खलिफाचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यास इंग्लंड अमेरिकेला मदत करील अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी केली आहे. इसिस वा इस्लामिक स्टेटस् ही संघटना बोस्नियातील पडीक जमिनी विकत घेत असून युरोपच्या मध्यभागी आपला तळ उभारण्याची तयारी करीत आहे. (वृत्तसंस्था)