ब्रिटन हल्ल्यामागे इसिसचा हात
By admin | Published: March 23, 2017 07:55 PM2017-03-23T19:55:31+5:302017-03-23T20:03:42+5:30
ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 23 - ब्रिटनच्या (युनायडेट किंग्डम) संसदेवर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
काल संध्याकाळी ब्रिटन संसदेबाहेरच्या परिसरात हल्लोखोरांनी पादचाऱ्यांना कारने चिरडणे, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशाप्रकारे दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये एका हल्लेखोराचा आणि पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आज इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. यावेळी इसिसनने असे म्हटले की, आमच्या संघटनेच्या सैनिकाकडूनच ब्रिटनच्या संसदेवर हल्ला करण्यात आला.
दरम्यान, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थेरेसा मे यांनी आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, हल्ला करणारा हल्लेखोर ब्रिटनमध्येच जन्मलेला होता आणि गुप्तचर यंत्रणांनी काही वर्षांपूर्वी त्याची चौकशीही केली होती, अशी माहिती ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दिली.
तसेच, या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा ठिकाणी छापे टाकले असून आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख मार्क रॉवेल यांनीही हल्ल्याबाबत अधिक माहिती दिली.
#ISIS claims "Soldier of the Caliphate" carried out attack on the #BritishParliament.
— Press Trust of India (@PTI_News) March 23, 2017