इसिसच्या बाल मारेकऱ्याचा मृत्यू
By admin | Published: August 2, 2015 10:27 PM2015-08-02T22:27:32+5:302015-08-02T22:27:32+5:30
इसिसच्या चित्रफितीत इराकी हेराचा शिरच्छेद करताना दाखविण्यात आलेला बालमारेकरी हवाई हल्ल्यात मारला गेला. साईट या गुप्तचर संघटनेने दिलेल्या
लंडन : इसिसच्या चित्रफितीत इराकी हेराचा शिरच्छेद करताना दाखविण्यात आलेला बालमारेकरी हवाई हल्ल्यात मारला गेला. साईट या गुप्तचर संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या मुलाचे नाव अबू ओमर कवाझ असे होते. तो हवाई हल्ल्यात मारला गेल्याची चर्चा इसिस जिहादीत सुरू होती.
इसिसने मे महिन्यात प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत इसिसचा गणवेश असणारा काळा पोशाख घातलेला हा मुलगा हातात ९ मिमिची बंदूक घेऊन केशरी कपडे घातलेल्या इराकी हेराला गोळी घालताना दाखविला होता. या चित्रफितीत नंतर हा मुलगा कोठेच दाखविण्यात आला नाही. त्यावरून इराकी हेराची हत्या दुसऱ्या प्रौढ मारेकऱ्याने केली असावी व नंतर या मुलाला बंदूक रोखून उभे राहिलेले दाखविले असावे असे मानले जात आहे. इसिस जिहादी जॉन या मारेकऱ्यानंतरची पिढी तयार करीत आहे. या मुलाना शूर बनविण्यासाठी असे तयार केले जात आहे, तर या परिस्थितीत जिहादी जॉन जीव घेऊन पळून गेला असल्याचेही वृत्त आहे.