इसिसचा म्होरक्या व प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी ठार
By admin | Published: September 13, 2016 08:20 AM2016-09-13T08:20:31+5:302016-09-13T09:22:43+5:30
इस्लामिक स्टेट' (इसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १३ - ' इस्लामिक स्टेट' (इसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यूमुखी पडला आहे. पेंटागॉन येथून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला असून अमेरिकेने गेल्या महिन्यात सीरिया येथे केलेल्या हल्ल्यात तो ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
'सीरियातील अल बब जवळ करण्यात आलेल्या हल्ल्यात इसिसचा प्रमुख व मुख्य प्रचारक असलेल्या अबू मोहमद अल अदनानी याचा खात्मा करण्यात आला. तो तरूणांना इसिसमध्ये भरती करत असे तसेच इसिसच्या दहशतवादी हल्ल्यांच्या आखणी करण्याची, योजनांची जबाबदारीही त्याच्याकडे सोपवण्यात आली होती' असे पेंटागॉनमधील अधिका-यांनी सांगितले. '३० ऑगस्ट रोजी प्रिडेटर ड्रोनमधून अदानीच्या कारवर मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये तो ठार झाला' असेही त्यांनी सांगितले.
'इसिस'चा मुख्य प्रवक्ता असण्यासोबतच गेल्या वर्षभरात इसिसने पॅरिस, ब्रसेल्स आणि इंस्ताबूल विमानतळ तसेच बांग्लादेशमधील रेस्टॉरंटवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही अबू मोहमद अल अदानीने प्रमुख भूमिका निभावली होती, असे समजते.