बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर हल्ला; जमावाकडून तोडफोड, अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 01:09 PM2022-03-18T13:09:10+5:302022-03-18T13:10:07+5:30
ISKCON Radhakanta temple in Bangladesh : बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे.
ढाका : होळीच्या (Holi) एक दिवस आधी गुरुवारी बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाका (Dhaka) येथील इस्कॉन मंदिरावर (Iskcon Temple) हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 150 लोकांच्या जमावाने मंदिरात घुसून तोडफोड केली. यासोबतच, याठिकाणी लूटमारही करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
इस्कॉनचा भाग असलेल्या ढाक्यातील राधाकांता मंदिरात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या हल्ल्याचे काही फोटो आणि माहिती शेअर केली आहे. मंदिराची भिंत पाडण्यात आल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. तसेच, याठिकाणी असलेले साहित्य सुद्धा लुटण्यात आले आहे.
On the night of shab-e-barat, Extremists are again attacking the Wari Radhakanta #ISKCON temple in Dhaka. We are requesting to all the Hindus to play their role in protecting the temple. #SaveBangladeshiHindus#SaveHinduTemplesInBangladesh@RadharamnDas@iskcon@india_iskconpic.twitter.com/DVLZF7yVPG
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) March 17, 2022
दरम्यान, दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पोलिसांनाही या हल्ल्याची माहिती दिली, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही बांगलादेशातील मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चौमुनी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधाकृष्ण गौरा नित्यानंद ज्यू मंदिरावरही जमावाने हल्ला करून तोडफोड केली होती. या हल्ल्यात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली होती. यासोबतच इतर अनेक शहरांमध्ये मंदिरांवरही हल्ले झाले होते.