आयएसने केली ३९ भारतीयांची हत्या?
By admin | Published: November 28, 2014 09:21 AM2014-11-28T09:21:02+5:302014-11-28T14:59:19+5:30
इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - इराकमधील इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या ४० भारतीयांपैकी ३९ जणांची हत्या केल्याची बातमी एका वृत्तवाहिनीने दिल्याने खळबळ माजली आहे. दोन बांगलादेशी नागरिकांच्या निवेदनाच्या आधारे हे वृत्त देण्याच आले आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा त्वरित फेटाळून लावला आहे. इराकमध्ये पाच महिन्यांपूर्वी ४० भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते,
आयएसच्या तावडीतून जिवंत वाचलेल्या भारतीय नागरिक हरजित याच्याशी या दोन बांगलादेशी नागरिकांशी नागरिकांनी संपर्क साधल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. कुर्दिस्तानची राजधानी असलेल्या एर्बिल येथे शफी व हसन या दोन बांगलादेशी नागरिकांशी बोलल्यानंतर ३९ भारतीयांची हत्या करण्यात आल्याचा दावा वाहिनीने केला आहे.
आयएसच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून पळालेल्या हरजितने इतर सर्व भारतीयांची हत्या करण्यात आली असे शफी व हसन यांना सांगितले. हरजितलाही दोन गोळ्या घालण्यात आल्या होत्या, मात्र त्याने मरण्याचे नाटक केले व संधी मिळताच तो तिथून पळाला. पाच महिन्यांपूर्वी मोसूलहून बगदाद येथे जाताना ४० भारतीयांचे अपहरण केले. आयएसने एकूण ५१ बांगलादेशी व ४० भारतीयांना बंदी बनवले होते, असे शफीने सांगितले.
दरम्यान भारतीय सुरक्षा अधिका-यांनीही याआधी हरजितची मुलाखत घेतली होती. त्यावेळी हरजितकडून मिळालेली माहिती व आत्ता बांगलादेशी नागरिकांनी दिलेली माहिती याच बराच फरक असल्याचे सांगत आयएसच्या ताब्यातील भारतीयांची हत्या करण्यात आल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.