BREAKING: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरी पोहोचले पोलीस, अटकेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 01:54 PM2023-03-05T13:54:45+5:302023-03-05T13:56:07+5:30

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन पोलीस त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आहेत.

islamabad police arrive at imran khans zaman park residence with arrest warrant | BREAKING: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरी पोहोचले पोलीस, अटकेची शक्यता

BREAKING: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरी पोहोचले पोलीस, अटकेची शक्यता

googlenewsNext

इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन पोलीस त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आहेत. इस्लामाबाद पोलीस रविवारी तोशखाना प्रकरणी अटक वॉरंट घेून पीटीआयचे अध्यक्ष इमरान खान यांच्या जमां पार्क स्थित निवासस्थानी पोहोचले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी २८ फेब्रुवारी झालेल्या सुनावणीत इमरान खान यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होतं. 

पाकिस्तानातील जिओ न्यूजच्या माहितीनुसार इस्लामाबाद पोलीस इमरान खान यांना अटक करण्यासाठी लाहोरमध्ये आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार सर्व कायदेशीरबाबी पूर्ण झाल्यानंतर इमरान खान यांना अटक केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. 

इम्रान खान यांना अटक होता परिस्थिती चिघळणार
पीटीआयचे ज्येष्ठ उपाध्यक्ष फवाद चौधर यांनी इमरान खान यांना अटक केली गेली तर देशातील स्थिती आणखी खराब होईल असं विधान केलं आहे. "इमरान खान यांना अटक करण्याचे कोणतेही प्रयत्न या देशातील वातावरण आणखी खराब होण्यास कारणीभूत ठरतील. माझं पाकिस्तान विरोधी आणि अकार्यक्षम सरकारला विनंती आहे की त्यांनी देशाला आणखी संकटात टाकू नये", असं फवाद म्हणाले. 

तोशखाना प्रकरणाच्या सुनावणीवेळी इमरान यांची अनुपस्थिती
२८ फेब्रुवारी रोजी अनेक प्रकरणांअंतर्गत इमरान खान यांना कोर्टासमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. यातील काही प्रकरणांमध्य खान यांना दिलासा देखील मिळाला. पण तोशखाना प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगली तलवार आहेच. 

Web Title: islamabad police arrive at imran khans zaman park residence with arrest warrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.