इस्लामिक स्टेटने स्वीकारली श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:45 PM2019-04-23T16:45:28+5:302019-04-23T17:11:12+5:30

रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे.

Islamic State claims responsibility for Sri Lanka bombings | इस्लामिक स्टेटने स्वीकारली श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी

इस्लामिक स्टेटने स्वीकारली श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी

कोलंबो - रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि नजिकच्या परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने स्वीकारली आहे. रविवारी घडवून आणलेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमुळे आतापर्यंत सुमारे 320 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडोजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ख्राईस्टचर्च येथील मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेमध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करून हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचे श्रीलंकन सरकारने आज संसदेत सांगितले होते.
 
 श्रीलंकेतील स्थानिक इस्लामी कट्टरवादी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) हिचा या साखळी बॉम्बस्फोटांमागे हात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र कुठल्याही संघटनेने आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अखेरीस इस्लामिक स्टेटने आज या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली. इस्लामिक स्टेट या दहशतावी संघटनेने अल अमाक या  यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले आहे.


रविवारी जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात 320 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. 
 

Web Title: Islamic State claims responsibility for Sri Lanka bombings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.