हे तर इस्लामिक दहशतवादी - तस्लिमा नसरीन

By admin | Published: July 2, 2016 11:45 AM2016-07-02T11:45:41+5:302016-07-02T11:49:02+5:30

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ढाका येथील दहशतवादी हल्ल्याची निंदा करत निरपराधांना मारणारे हे हल्लेखोर इस्लामिक दहशतवादी असल्याचे म्हटले आहे

This is the Islamic terrorist - Taslima Nasreen | हे तर इस्लामिक दहशतवादी - तस्लिमा नसरीन

हे तर इस्लामिक दहशतवादी - तस्लिमा नसरीन

Next
ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २ - बांगलादेशची राजधानी ढाका येथील दहशतवादी हल्ल्याचा थरार अखेर संपुष्टात आला असून पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर एकाला अटक केली आहे. शुक्रवारी रात्री सुरू झालेली ही धुमश्चक्री १३तासांनंतर संपुष्टात आली असून त्यामध्ये २० निरपराधांना प्राण गमवावे लागले आहे. या हल्ल्याची जगभरातून निंदा होत असून प्रख्यात बांगलादेशी लेखिका यांनीही हल्ल्याबाबत ट्विट करत ' अल्लाहू-अकबरच्या घोषणा देत असा नृशंस हल्ला करणा-या या हल्लेखोरांना इस्लामिक दहशतवादी म्हटले पाहिजे' असे म्हटले आहे. 
ढाका येथील परदेशी दूतावास, वकिलांतीची कार्यालये असलेला, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहात शुक्रवारी रात्री ८-१० दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार व बॉम्बहल्ले केल्याने एकच हाहाकार उडाला.  'इसिस' या कुख्यात दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. संपूर्ण जग या हल्ल्याने हादरलेले असतानाच तस्लिमा नसरीन यांनीही ट्विटरद्वारे आपल्या भावनांना वाट करून दिली. ट्विट्सच्या माध्यमातून या हल्ल्याची खबरबात देतनाचा तस्लिमा यांनी त्याबाबत टिप्पणीही केली. 
 
    आणखी वाचा :
(बांगलादेशात इसिसचा दहशतवादी हल्ला, 20 जणांचा मृत्यू)
(ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका) 
  •  
 
'मीडियाने या हल्लेखोरांचा उल्लेख बंदूकधारी असा केला. मात्र अल्लाहू-अकबरची घोषणा देत निरपराध नागरिकांना घाबरवणा-या व त्यांना ठार मारणा-या यांना इस्लामिक टेररिस्ट म्हटले पाहिजे! नाही का?' असा सवाल त्यांनी केला आहे.  या ८ दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिस, रॅपीड अॅक्शन फोर्स, लष्कर व नौदलाचे जवान एकत्र येऊन झुंज देत आहेत. ६ तास उलटून गेल्यावरही काहीही निष्पन्न झालेले नाही, असेही तस्लिमा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 
 
 

Web Title: This is the Islamic terrorist - Taslima Nasreen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.