इस्लामचा धर्माचा दर्जा बांगलादेश वगळणार?
By admin | Published: March 7, 2016 03:09 AM2016-03-07T03:09:11+5:302016-03-07T03:09:11+5:30
बांगलादेशचा अधिकृत धर्म म्हणून इस्लाम वगळला जाऊ शकतो. देशात गेल्या काही महिन्यांत ख्रिश्चन्स, हिंदू आणि मुस्लिमांतील अल्पसंख्य शिया यांच्यावर झालेले प्राणघातक हल्ले हे इस्लामिक स्टेटच्या
ढाका : बांगलादेशचा अधिकृत धर्म म्हणून इस्लाम वगळला जाऊ शकतो. देशात गेल्या काही महिन्यांत ख्रिश्चन्स, हिंदू आणि मुस्लिमांतील अल्पसंख्य शिया यांच्यावर झालेले प्राणघातक हल्ले हे इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी केले असल्याचे मानले जाते. बांगलादेशचा अधिकृत धर्म इस्लामला वगळण्यात यावे या बाजूने सध्या न्यायालय युक्तिवाद ऐकत आहे, असे ‘डेली मेल’ने वृत्त दिले.
१९८८ पासून इस्लाम हा बांगलादेशचा अधिकृत धर्म बनला आहे. अधिकृत धर्म म्हणून त्याला वगळण्यात यावे या मागणीला अनेक अल्पसंख्य धार्मिक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. अशी मागणी करणाऱ्यांचा युक्तिवाद असा की इस्लामला असा दर्जा देणे बेकायदा आहे. बांगलादेशात ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम व इतर अल्पसंख्य समाज दोन टक्के असताना या मागणीला किती व्यापक पाठिंबा मिळेल हे अस्पष्ट आहे. गेल्या महिन्यात बांगलादेशात पंचगढ जिल्ह्यायात हिंदू मंदिरावर अतिरेक्यांनी हल्ला करून त्याच्या पुजाऱ्याची हत्या केली होती.