इस्रायलची गाझातील रुग्णालयावर बॉम्बफेक; हमासने हल्ल्यासाठी बायडेन यांना धरलं जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 10:53 AM2023-11-15T10:53:25+5:302023-11-15T10:54:03+5:30
Israel Palestine Conflict : इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलवर हल्ला केला आहे.
इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलवर हल्ला केला आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार हमास या हॉस्पिटलचा कमांड सेंटर म्हणून वापर करत आहे. रुग्णालय हजारो आजारी, विस्थापित गाझावासियांना आश्रय देत आहे आणि या हालचालीमुळे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय टीका तीव्र होऊ शकते. इस्रायली सैन्याने सांगितलं की ते अल-शिफा हॉस्पिटलमध्ये हमासविरूद्ध अचूक आणि लक्ष्यित अभियान चालवत आहेत.
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने एका निवेदनात म्हटलं आहे की, त्यांनी "गाझामधील संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा कळविलं आहे की हॉस्पिटलमधील सर्व लष्करी गोष्टी 12 तासांच्या आत बंद करणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, असं झालं नाही. युनायटेड नेशन्सचा अंदाज आहे की किमान 2,300 रुग्ण, कर्मचारी आणि विस्थापित नागरिक आत आहेत. जे अनेक दिवसांच्या भीषण लढाईत आणि हवाई बॉम्बस्फोटात अडकले आहेत.
इस्रायलने गेल्या अनेक दिवसांपासून गाझामधील वेगवेगळ्या रुग्णालयांना लक्ष्य केलं आहे. या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपर्यंत रुग्णालयात 36 अर्भकांची काळजी घेण्यात येत होती. वीकेंडमध्ये इनक्यूबेटर चालू ठेवणाऱ्या पॉवर जनरेटरसाठी हॉस्पिटलचे इंधन संपल्याने तीन बाळांचा मृत्यू झाला आहे. य़ामुळे परिस्थिती गंभीर आहे.
इस्रायल आणि युनायटेड स्टेट्स या दोघांनी म्हटलं आहे की हमासचे सदस्य ओलिसांना लपविण्यासाठी कमांड पोस्ट आणि गाझा रुग्णालये उभारण्यासाठी भूमिगत बोगद्यांचा वापर करत आहेत. अल-शिफा रूग्णालयातील ऑपरेशनसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे जबाबदार असल्याचा आरोप हमासने केला आहे. हमासने एका निवेदनात म्हटलं आहे की, अल-शिफा वैद्यकीय संकुलावरील हल्ल्यासाठी आम्ही इस्रायल आणि बायडेन