इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 20:55 IST2024-06-07T20:53:21+5:302024-06-07T20:55:20+5:30
Israel Air Strike in Gaza, 18 Kids died: इस्रायलकडून मात्र दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

इस्रायलचा मध्य गाझामध्ये हवाईहल्ला; ४० पॅलेस्टाइन नागरिक ठार, १८ लहान मुलांचा समावेश
Israel Air Strike in Gaza, 18 Kids died: इस्रायलने मध्य गाझावर हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये लहान मुलांसह १८ जण ठार झाले. विस्थापित पॅलेस्टाइन कुटुंबांना आश्रय देणाऱ्या आणि संयुक्त राष्ट्रसंघांनी संचालित केलेल्या शाळेत गुरुवारी सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले नुसेरात आणि मघाजी या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये आणि देर अल-बालाह आणि झवायदा या शहरांमध्ये करण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मृतांमध्ये नुसेरात निर्वासित छावणीच्या मेयरचा समावेश आहे.
इस्त्रायली सैन्याने शुक्रवारी सांगितले की, ते मध्य गाझामधील काही भागांमध्ये कारवाई सुरू ठेवत आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या जवानांनी डझनभर दहशतवाद्यांना ठार केले. बोगद्याच्या शाफ्टचा शोध घेण्यात आला आणि परिसरातील पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. नुसेरात येथील निर्वासितांच्या छावण्या यूएन संचालित शाळेत किमान ३३ लोक मारले गेल्याच्या एका दिवसानंतर हा हल्ला झाला. याचा वापर इस्रायलने हमास कंपाउंड म्हणून केला जात असल्याचे सांगितले.
इस्रायलवर गाझामध्ये नरसंहार केल्याचा आरोप
हमास विरुद्धच्या युद्धात नरसंहारासाठी दबाव निर्माण होत आहे. दरम्यान, अनेक देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची मागणी केली आहे. स्पेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मागणी केली आहे की, गाझामध्ये इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खटल्यात सहभागी होण्यासाठी ते संयुक्त राष्ट्र न्यायालयाची परवानगी घेणार आहेत.
इस्रायलच्या बॉम्बस्फोटात आणि गाझामध्ये आठ महिन्यांपासून ३६ हजारांहून अधिक पॅलेस्टाइन नागरिक मारले गेले आहेत. युद्धामुळे उपासमार असलेल्या पॅलेस्टाइन नागरिकांना अन्न, औषध आणि इतर पुरवठा मोठ्या प्रमाणात थांबवण्यात आला आहे.