इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:04 PM2024-10-11T12:04:15+5:302024-10-11T12:04:34+5:30
इस्रायलच्या सैन्याने रणगाड्यांमधून संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षक सैन्याच्या मुख्यालयावर गोळे डागले आहेत. यामध्ये दोन शांतिरक्षक सैनिक जखमी झाले आहेत.
गाझामध्ये आज झालेल्या जमिनीवरील चकमकीत तीन इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. अशातच इस्रायलने आज लेबनानमधील भारतीय सैनिक असलेल्या ठिकाणी रणगाड्यांनी हल्ला केला आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांत खळबळ उडाली आहे. हिजबुल्लाहविरोधात उघडलेल्या मोहिमेत इस्रायली सैन्याला जमिनीवर पुढे जाता येत नाहीय. हिजबुल्लाचे दहशतवादी इस्रायली सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी इस्रायलने रणगाडे घुसविल्याचे वृत्त आहे.
इस्रायलच्या सैन्याने रणगाड्यांमधून संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षक सैन्याच्या मुख्यालयावर गोळे डागले आहेत. यामध्ये दोन शांतिरक्षक सैनिक जखमी झाले आहेत. हे सैनिक इंडोनेशियाचे आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दक्षिणी लेबनानमध्ये १० हजार सैनिक तैनात केले आहेत. यात ९०० भारतीय सैनिकही आहेत. इस्रायलच्या या कुरापतीमुळे संयुक्त राष्ट्रे भडकली आहेत.
इस्रायली सैन्याच्या या कृत्यामुळे युरोपिय देश खवळले आहेत. इस्रायलनेही संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर हल्ला केल्याचे कबुल केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या चौकीजवळ हिजबुल्लाहचे दहशतवादी लपून गोळीबार करत होते. यामुळे हा हल्ला केल्याचे म्हटले आहे.
तर इटलीने इस्रायलचे हे कृत्य युद्ध गुन्हा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेनेही हे कृत्य चिंताजनक आहे, असे म्हटले आहे. इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या चौक्या दुसरीकडे हलवाव्यात अशी गेल्या आठवड्यातचम मागणी केली होती. ही मागणी संयुक्त राष्ट्रांनी फेटाळली होती. आपण हिजबुल्लाहच्याच ठिकाण्यांना निशाना बनवत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
गाझामध्ये लढाई सुरुच...
गाझा येथील जबलिया येथे मारल्या गेलेल्या तीन इस्रायली सैनिकांच्या पार्थिवावर शुक्रवारी जेरुसलेममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इस्रायली सैन्याने जबलियाला वेढा घातला असून तेथील हमासच्या स्थानांना लक्ष्य केले आहे.