Israel: इस्रायलकडून गाझा पट्टीवर रात्रभर बॉम्बचा वर्षाव; हमासचा म्होरक्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:22 PM2023-10-14T12:22:10+5:302023-10-14T12:40:59+5:30
७ ऑक्टोबरपासून इस्रायली लष्कर गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक करत आहे. हमासचे एक हजाराहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत
हमासने इस्रायलवर हवाई हल्ले केल्यापासून दोघांमध्ये प्रचंड तणावपूर्ण वातावरण आहे. हमासच्या दहशतवाद्यांनीइस्रायलचे अनेक नागरिक ओलीस ठेवले असून त्यांच्या सुटकेसाठी इस्रायलचे प्रयत्न सुरी आहेत. अशा स्थितीत आता इस्रायलच्या 'सायरेत मतकल' या विशेष युनिटच्या शक्तीची चर्चा सुरू झाली आहे. इस्रायलच्या या युनिटची यशस्वी होण्याची टक्केवारी १०० टक्के आहे. त्यामुळे, इस्रायल आक्रमक बनला असून गाझा पट्टीवर आणि हमासवर जोरदार आक्रमण करत आहे. तर, वेस्ट बँक येथील हमासच्या २३० जणांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे.
७ ऑक्टोबरपासून इस्रायली लष्कर गाझामध्ये जोरदार बॉम्बफेक करत आहे. हमासचे एक हजाराहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. इस्रायल आता गाझामध्ये त्याच प्रकारची कारवाई करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या वायू दलाचा मुख्य कमांडर ठार झाल्याची माहिती इस्रायलमधील एका वर्तमानपत्राने दिले आहे. इस्रायलने रात्रभर गाझा पट्टीत हवाई बॉम्बहल्ले केले आहेत. या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाच्या प्रमुखाला ठार करण्यात आल्याची माहिती आहे. मुरदा अबु मुराद असं या हमास प्रमुखाचं नाव आहे. हमासचे दहशतवादी जेथून हवाई कारवाया करत होते, त्याच मुख्यालयास इस्रायलने लक्ष्य केले. दरम्यान, अबु मुरादने गेल्या आठवड्या झालेल्या नरसंहारात दहशतवाद्यांना कमांड देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
इस्रायलची स्पेशल फोर्स मैदानात
इस्रायलकडून घरात घुसून शत्रूला मारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हमासने शेकडो इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलने बॉम्बफेक थांबवली नाही तर ओलिसांना मारले जाईल, असे हमासने म्हटले आहे. पण हमासच्या धमकीनंतर इस्रायल आता ओलिसांची सुटका करण्यासाठी आपले विशेष युनिट 'सायरेत मतकल' मैदानात उतरले आहे. दरम्यान, इस्रायलची सायरेत मतकल ही जगातील सर्वात धोकादायक स्पेशल फोर्स मानली जाते. सायरेत मतकलच्या खतरनाक कमांडोंनी अशा अनेक कारवाया केल्या आहेत, ज्यामुळे या इस्रायली सैन्याची ताकद जगाने ओळखली आहे.
इस्रायल लढवय्या देश
इस्रायलचा इतिहास काढून पाहिला तर हा देश कधीही घाबरलेला नाही किंवा मागे हटलेला नाही. त्यातच आता इस्रायलचे 'सायरेत मतकल' युनिट युद्धात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज झाले आहे. इस्रायल भारताच्या केरळ राज्यापेक्षा आकाराने लहान आहे, परंतु ते नेहमीच आपल्या शत्रूंबद्दल कठोर राहिले आहे. त्याचे सर्व शेजारी देश हे मुस्लिम आहेत. त्यापैकी बहुतेक इस्रायलचे कट्टर शत्रू आहेत, जे त्यावर हल्ला करण्याची वाट पाहत आहेत. पण, इस्रायलच्या एजन्सी हजारो किलोमीटर दूर बसून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात आणि संधी मिळताच शत्रूचा नाश करतात.