Israel Demolished Home: दंगेखोरांना वठणीवर आणण्यासाठी इस्रायलनं वापरला CM योगी आदित्यनाथांचा फंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 04:18 PM2022-07-26T16:18:24+5:302022-07-26T16:19:04+5:30
यावेळी सैनिकांवर पेट्रोल बॉम्ब आणि जळती टायरही फेकण्यात आली.
खरे तर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) ज्या पद्धतीने काम करतात, त्याची चर्चा, देशासह संपूर्ण जगभरात होत असते. मात्र, आता तर चक्क इस्रायलनेही तेथील दंगलखोरांचा सामना करण्यासाटी योगी आदित्यनाथ यांना फॉलो केले आहे. इस्रायलच्या सैन्याने (Israel Army) आज (मंगळवारी) त्यांच्या सुरक्षा रक्षकाची हत्या करणाऱ्यांची घरे उद्धवस्त केली आहेत. येथील वेस्ट बँक (West Bank) येथील वस्तीत राहणाऱ्या दोन पॅलेस्टाईनच्या संशयितांनी (Palestine Suspects) गोळी झाडून इस्रायली सुरक्षा रक्षकाची हत्या केली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली.
वेस्ट बँकमध्ये उद्धवस्त करण्यात आली घरे -
गेल्या 29 एप्रिलला वेस्ट बँकमध्ये एका यहूदी वस्तीच्या प्रेवेश द्वाराजवळ झालेल्या गोळीबारात व्याचेस्लाव गोलेव्ह नावाच्या एका इस्रायली सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला होता. यानंतर, पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर, इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टाइनच्या दोन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
इस्रायली सेनिकांनी संशयितांची घरे केली भूईसपाट -
इस्रायली सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नॉर्थ वेस्ट बँक भागातील करावत बानी हसन गावात संशयितांची घरे उद्धवस्त केली आहेत. इस्रायलली सैनिकांनी म्हटल्या प्रमाणे या कारवाईत त्यांनी त्यांच्या सैनिकांवर हल्लाही झाला. मात्र, घरे पाडण्याचे काम यशस्वीपणे पार करण्यात आले. यावेळी सैनिकांवर पेट्रोल बॉम्ब आणि जळती टायरही फेकण्यात आली.
तत्पूर्वी, उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशाच प्रकारची कारवाई करत, तेथील गुन्हेगारांच्या अवैध संपत्तीवर बुलडोझर चालवत ती भूईसपाट करण्याची कारवाई केली आहे. या यादीत मोठ-मोठ्या गुन्हेगारांच्या नावाचाही समावेश आहे. यानंतर योगींच्या पावलावर पाऊल ठेवत मध्य प्रदेशातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.