इस्रायलचा अभेद्य बुलडोझर युद्धभूमीवर; रॉकेट हल्ल्याची 'दांडी गूल'! नाव काय, किंमत किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 07:07 PM2023-10-14T19:07:22+5:302023-10-14T19:09:20+5:30
Israel deploys world most indestructible bulldozer against Hamas: AK-47 तर सोडाच, रॉकेट, RPG, भूसुरूंग अन् स्नायपर हल्ल्यांचाही होत नाही परिणाम
Israel deploys world most indestructible bulldozer against Hamas: इस्रायलने हमासच्या हल्ल्यानंतर गाझामध्ये आपल्या हल्ल्याचे नेतृत्व करण्यासाठी आता नवा 26 फूटी लांब अभेद्य बुलडोझर उतरवला आहे. हा बुलडोझर गाझा सीमेवर उभ्या असलेल्या 360,000 इस्रायली सैनिकांना मार्ग दाखवण्याचं काम करणार आहे. हमासच्या हल्ल्यात 1300 हून अधिक नागरिक मारले गेल्यानंतर, इस्रायली संरक्षण दलांनी बदला घेण्यासाठी आपली संपूर्ण लष्करी शक्ती वापरली आहे. इस्रायलने गाझा पट्टीलाही पूर्णपणे वेढा घातला आहे. अशा परिस्थितीत या दाट लोकवस्तीच्या भागात मार्ग काढण्यासाठी इस्रायलला आपल्या सुपर पॉवरफुल बुलडोझरची मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. दाट लोकवस्तीच्या गाझा पट्टीतही हा बुलडोझर सहज मार्ग काढू शकतो असे सांगितले जात आहे.
इस्रायली सैन्याच्या या बुलडोझरचे नाव काय?
इस्रायली लष्कराच्या शस्त्रागारात समाविष्ट असलेल्या या बुलडोझरचे नाव D9R आहे. D9R आर्म्ड (शस्त्रास्त्रांनी युक्त) बुलडोझरमध्ये 15 टन अतिरिक्त चिलखत बसवले आहे. त्याला डूबी किंवा टेडी बेअर असेही म्हणतात. हा तोच बख्तरबंद बुलडोझर आहे, ज्याला पाहून हमासचे दहशतवादीही घाबरतात. हा बुलडोझर इतका शक्तिशाली आहे की AK-47 तर सोडा, अगदी रॉकेट आणि RPG हल्ल्यांचाही त्यावर काहीही परिणाम होत नाही. लँडमाइन्स आणि स्नायपर हल्ल्यांचाही या बुलडोझरवर काहीही परिणाम होत नाही. गाझा पट्टीच्या दाट लोकवस्तीच्या भागात असलेल्या रस्त्यांच्या चक्रव्यूहावर मात करून ते बहुमजली इमारती सहज फोडू शकते आणि सरळ आणि सपाट रस्ते तयार करू शकते.
या इस्रायली बुलडोझरची किंमत किती आहे?
रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड्सपासून अधिक संरक्षण प्रदान करण्यासाठी 2015 मध्ये D9R ला "स्लॅट आर्मर"ने अपग्रेड केले गेले. हा बुलडोझर आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास सक्षम आहे. ते खंदक खोदून पूल बांधू शकते. इस्रायली सैन्यात समाविष्ट असलेल्या या बुलडोझरची किंमत 7 लाख 39 हजार पौंड आहे. नंतर इस्रायली तज्ज्ञांनी याला अनेक प्रकारच्या विशेष शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. त्यामुळे बुलडोझरचे वजन वाढत असले तरी त्याला सर्व प्रकारच्या शस्त्रांपासून संरक्षण मिळते.