हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 07:18 AM2023-10-08T07:18:05+5:302023-10-08T07:18:37+5:30

गेल्या काही वर्षांत इस्रायलच्या हद्दीत झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या कारवायांचा बीमोड करण्याचा आदेश सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिला आहे. 

Israel draws sword after Hamas rocket attack; A heavy price must be paid PM Netanyahu's warning | हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने उपसली ‘तलवार’; मोठी किंमत चुकवावी लागेल; PM नेतान्याहू यांचा इशारा

googlenewsNext

जेरुसलेम :  गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी केलेल्या हल्ल्यात इस्रायलमधील २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. शत्रूने आमच्यावर केलेल्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा नेतान्याहू यांनी हमासला दिला. 

गेल्या काही वर्षांत इस्रायलच्या हद्दीत झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या कारवायांचा बीमोड करण्याचा आदेश सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिला आहे. 

इस्रायल लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, प्रत्युत्तरासाठी इस्रायलने ऑपरेशन आयर्न स्वाेर्ड्स ही मोहीम हाती घेतली आहे. त्याद्वारे जमीन, समुद्रमार्गे तसेच हवाई हल्ल्यांद्वारेही शत्रूला जेरीस आणण्यात येईल. गाझा भागातून हमासच्या दहशतवाद्यांनी हजाराे रॉकेटचा मारा केल्याचा दावा हमासने केला. 

५,००० राॅकेट केवळ २० मिनिटांत डागून हमासने इस्रायलला धक्का दिला.
२२ ठिकाणांवर हमासचे अतिरेकी आणि इस्रायलमध्ये चकमक सुरू हाेती.
हल्ल्यानंतर एअर इंडियाने शनिवारी तेल अवीवला जाणाऱ्या आपल्या विमानाची फेरी रद्द केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला तीव्र निषेध
इस्रायलवर हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात निरपराध लोक व त्यांच्या कुटुंबीयांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, इस्रायलला बिकट परिस्थितीचा सध्या सामना करावा लागत आहे. त्या देशाला भारताचा संपूर्ण पाठिंबा आहे, असेही मोदी यांनी म्हटले. 

ही पहिली झलक : हमास
nहमासच्या लष्कर विभागाचा प्रमुख मोहम्मद डेफ याने सांगितले की, इस्रायलने आमच्यावर केलेले आक्रमण थांबवावे. आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत. 
nशनिवारचा हल्ला ही त्याची पहिली झलक आहे. आम्ही क्रांतीची मशाल हाती घेतली आहे, असेही तो म्हणाला.

इस्रायलला अमेरिकेचे 
८ अब्ज डाॅलरचे पॅकेज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी इस्रयालसाठी ८ अब्ज डाॅलरचे तातडीचे लष्करी मदत पॅकेज मंजूर केले आहे. 

इस्रायलमध्ये सध्या किती भारतीय? 
इस्रायलमध्ये सध्या १८ हजार भारतीय राहत आहेत. इस्रायलमधील वृद्धांची देखभाल, हिऱ्यांचा व्यापार, माहिती- तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रांमध्ये भारतीय कार्यरत आहेत. अनेक 
भारतीय विद्यार्थी इस्रायलमध्ये शिकायला आले आहेत. 


 

Web Title: Israel draws sword after Hamas rocket attack; A heavy price must be paid PM Netanyahu's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.