इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांचे बोगदे पाण्याने भरले, भूमध्य समुद्रात बसवले मोठे पंप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:15 PM2024-01-31T17:15:23+5:302024-01-31T17:16:24+5:30
इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे.
इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या काही दिवसापासून युद्ध सुरू आहे. आता इस्रायली लष्कराने हमासच्या दहशतवाद्यांच्या बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरत आहेत. इस्रायली सैन्य गाझामधील ८०० हून अधिक बोगद्यांमध्ये पाणी भरण्यासाठी अनेक आठवड्यांपासून तयारी करत होते. इस्रायल हे बोगदे खारट समुद्राच्या पाण्याने भरत आहे. यासाठी मोठे पंप बसविण्यात आले आहेत.
याबाबतचा अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने खुलासा केला आहे. यामध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देत इस्त्रायली लष्कराने भूमध्य समुद्राजवळ पाच मोठे पंप बसवल्याचे सांगितले आहे. या माध्यमातून सर्व बोगदे समुद्राच्या पाण्याने भरले जातील. हे पंप अल-शाती निर्वासित छावणीच्या उत्तरेला बसवण्यात आले होते. त्यांच्याकडून सुमारे दीड किलोमीटर लांबीचे पाइप टाकण्यात आले आहेत.
आणखी एक धक्का! तोशाखाना प्रकरणी इम्रान खान, बुशरा बीबी यांना १४ वर्षांची शिक्षा
प्रत्येक पंपामध्ये दर तासाला हजारो घनमीटर पाणी खेचण्याची ताकद आहे. हमासचे दहशतवादी गाझामध्ये असलेल्या बोगद्यातून गनिमी कावा करत असत. त्यावेळी इस्रायलने या प्रकल्पाबाबत अधिकृत निवेदन जारी केले नव्हते. गाळामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे हा प्रकल्प गाळावासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
बोगद्यांमध्ये पाणी भरण्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाईल, असे अमेरिकन वृत्तपत्राने म्हटले आहे. जेणेकरून ओलिसांची सुटका होईल. त्यानंतरच ते पाण्याने भरले जातील. समुद्राचे पाणी बोगद्यांमध्ये टाकल्यानंतर ते जमिनीतही शोषले जाईल. काही आठवडे किंवा महिन्यांनंतर हे बोगदे पाणी शोषून घेतील.
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन अल्टरमन यांनी सांगितले की, गाझाच्या बोगद्यांमध्ये समुद्रातून पाणी आणल्याने शहराच्या पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थेवर परिणाम होईल. अशा प्रयोगामुळे गाझाच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत कोणते बदल घडून येतील हेही माहीत नाही.