इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:13 AM2024-11-05T11:13:21+5:302024-11-05T11:14:23+5:30
Israel Hezbollah War: इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस जवळील भागांना हवाई हल्ले करून लक्ष्य केले.
Israel Airstrike in Syria, Hezbollah Intel Target: इस्रायलनेसीरियाची राजधानी दमास्कस जवळील भागांना हवाई हल्ले करून लक्ष्य केले. इस्रायली शत्रूने संध्याकाळी दमास्कसच्या दक्षिणेकडील अनेक नागरी स्थळांना लक्ष्य करून सीरियन गोलानच्या दिशेने हवाई हल्ले केले, ज्यामुळे खूप नुकसान झाले आहे, असे सीरियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. हानी किती प्रमाणात झाली याबाबतचे तपशील मात्र त्वरित उपलब्ध झालेले नाहीत.
WATCH: Israel bombed military sites in Iran, but its retaliation for an Iranian attack this month did not target the most sensitive oil and nuclear facilities and drew no immediate vows of vengeance https://t.co/FIM7ibcJwPpic.twitter.com/idwpBEnHXv
— Reuters Asia (@ReutersAsia) October 26, 2024
दरम्यान, इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी हिजबुल्लाची गुप्तचर क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशाने सीरियातील हिजबुल्लाहचे गुप्तचर मुख्यालय म्हणून वापरल्या जाणाऱ्या तळावर हल्ला केला. लष्कराने सांगितले की हल्ला केलेला तळ हा हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयाची एक शाखा म्हणून कार्यरत असल्याचे बोलले जात होते. येथे एक स्वतंत्र गुप्तचर तळ प्रस्थापित केला गेला होता. हिजबुल्लाच्या गुप्तचर प्रमुखाच्या आदेशाने येथील नेटवर्क वापरले जात होते.
ब्रिटनच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये दमास्कस ग्रामीण भागाच्या दक्षिण आणि आग्नेय भागात सय्यदाह झैनब येथील शेतांवर तीन स्वतंत्र हल्ल्यांचा समावेश आहे. हा हल्ला सीरियामधील हिजबुल्ला गुप्तचर मालमत्तेवर आणि लेबनानमधील हिजबुल्लाच्या तळावर केलेला हल्ला आहे.