दोनच पर्याय: पाय कापा किंवा मृत्यूला सामोरे जा! लाखो युद्धपीडितांचे जीवन झाले नरक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:29 AM2023-12-27T05:29:59+5:302023-12-27T05:30:38+5:30

९० टक्के लोकसंख्या अन्नटंचाईने त्रस्त आहे. जेवणासाठी १० तास रांगेत उभे राहावे लागते आहे.

israel gaza clashes lives of millions of war victims became hell | दोनच पर्याय: पाय कापा किंवा मृत्यूला सामोरे जा! लाखो युद्धपीडितांचे जीवन झाले नरक

दोनच पर्याय: पाय कापा किंवा मृत्यूला सामोरे जा! लाखो युद्धपीडितांचे जीवन झाले नरक

गाझा पट्टी ( Marathi News ): इस्रायली हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या २२ वर्षीय शाईमा नाबाहिनला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न पडला आहे. तिला डॉक्टरांनी दोनच पर्याय दिले आहेत. एकतर तिचा डावा पाय कापून टाकावा लागेल किंवा मृत्यूला सामोरे जावे लागेल. 

इस्रायली हवाई हल्ल्यात तिचा घोटा चिरडला गेल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिच्या रक्तात विष पसरत असल्याचे सांगत डॉक्टरांनी तिच्यापुढे ठेवलेला पहिला पर्याय तिने निवडला आहे. आता तिचा पाय गुडघ्यापासून खाली १५ सेंटिमीटर खाली कापण्यात येणार आहे. 

अन्नासाठी १० तास रांगेत

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझामध्ये उपासमारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. गाझातील ९० टक्के लोकसंख्या अन्नटंचाईने त्रस्त आहे. लोकांना जेवणासाठी १० तास रांगेत उभे राहावे लागते आहे.

विद्यार्थिनीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले

या निर्णयामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. गाझा युद्धात जखमी झालेल्या हजारो लोकांना या नरकस्थितीचा सामना करावा लागत आहे.
 

Web Title: israel gaza clashes lives of millions of war victims became hell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.