भीषण! गाझामधील वाढत्या मृत्यूमुळे अमेरिका चिंतित, इस्रायलला हल्ले कमी करण्याचं केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:26 AM2023-12-15T11:26:37+5:302023-12-15T11:33:55+5:30
Israel-Hamas War : हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धाला आता अनेक दिवस झाले आहेत. हल्ल्यात 1200 लोक मारले गेल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेलं युद्ध दिवसागणिक भीषण होत आहे. इस्रायल गाझामध्ये सतत हल्ले करत आहे, त्यामुळे मृतांचा आकडाही वाढत आहे. याच दरम्यान, अमेरिकेने इस्रायलला भविष्यात हमासवरील हल्ले कमी करण्यास सांगितलं आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांना गाझामधील लोकांचा जीव वाचवण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केलं. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी तेल अवीवमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान युद्धाबाबत चर्चा करताना ही माहिती दिली.
वॉशिंग्टनने इस्रायलच्या स्वत:चा बचाव करण्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले, परंतु पॅलेस्टिनी प्रदेशात वाढत्या नागरी हल्ल्यांमुळे जवळच्या मित्र राष्ट्रांमधील दरी वाढली आहे यावरही भर दिला. "माझी इच्छा आहे की त्यांनी नागरिकांचे जीव कसे वाचवायचे यावर लक्ष केंद्रित करावे, अधिक काळजी घ्या" असं देखील म्हटलं आहे.
व्हाईट हाऊसने यापूर्वी सांगितले होते की बायडेन यांचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा सहाय्यक सुलिवन यांनी युद्धाच्या वेळेवर इस्रायलवर दबाव आणला होता. कारण इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांना हा संघर्ष आणखी काही महिने असेल असं सांगितलं होतं. वॉशिंग्टन इस्रायलसाठी अटी सेट करत नाही परंतु सुलिव्हनने इस्रायलला पाठिंबा देताना आक्रमक दृष्टिकोनाबद्दल कठोर प्रश्न विचारले असं किर्बी यांनी म्हटलं आहे.
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धाला आता अनेक दिवस झाले आहेत. हल्ल्यात 1200 लोक मारले गेल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गाझा पट्टीवर हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, या हल्ल्यांमुळे गाझा उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यांमध्ये 1900 हून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत. गाझाचे रस्ते, शाळा आणि रुग्णालयांचे नुकसान झाले.