जबरदस्त! कॉफी, कुकीज देऊन वृद्धेने हमास दहशतवाद्यांना दिला चकमा; 'असा' वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 02:58 PM2023-10-19T14:58:26+5:302023-10-19T14:59:47+5:30
Israel Palestine Conflict : हमासच्या दहशतवाद्यांनी वृद्ध महिला एड्री आणि त्यांचे पती डेविड यांना त्यांच्या घरी 20 तास ओलीस ठेवलं होतं. यावेळी एड्री यांनी प्रसंगावधान दाखवल हमासच्या दहशतवाद्यांना चकमा दिला.
इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायलला भेट देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी 65 वर्षीय इस्रायली महिला राचेल एड्री यांची भेट घेतली. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली हल्ल्यात हमासच्या दहशतवाद्यांनी वृद्ध महिला एड्री आणि त्यांचे पती डेविड यांना त्यांच्या घरी 20 तास ओलीस ठेवलं होतं. यावेळी एड्री यांनी प्रसंगावधान दाखवल हमासच्या दहशतवाद्यांना चकमा दिला. इस्रायली सैनिक त्यांना वाचवायला घरी येईपर्यंत दहशतवाद्यांनी बोलण्यात अडकून ठेवलं.
हमासच्या दहशतवादी ग्रेनेडसह आलेले पाहून एड्री यांनी त्यांना फसवण्यासाठी कॉफी आणि कुकीज देऊ केल्या. त्याचवेळी इस्रायली सैन्य तेथे येईपर्यंत त्यांनी दहशतवाद्यांना आपल्या चर्चेत गुंतवून ठेवलं. हमास दहशतवाद्याने त्यांना घरी 20 तास ओलीस ठेवले होते, परंतु इस्रायली सैन्याने तेथे पोहोचताच त्यांनी दहशतवाद्याला ठार केलं. इस्रायल-हमास युद्धादरम्यान, वृद्ध महिला एड्री त्यांच्या कृतीमुळे चर्चेत आल्या आहे.
एड्री या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या इस्रायल भेटीदरम्यान भेटण्यासाठी आमंत्रित केलेल्या अनेक इस्रायलींपैकी एक होत्या. द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यात 5 हमास दहशतवाद्यांनी एका इस्रायली जोडप्याला बंदुकीच्या धाक दाखवून ओलीस ठेवलं होते. एड्री यांनी सांगितलं की, दहशतवादी खूप संतापले होते आणि त्यांनी त्यांच्यासाठी कॉफी आणि कुकीज तयार केल्या होत्या. यावेळी आद्रीने एका दहशतवाद्याच्या हातावर पट्टी बांधली होती आणि तो दुसऱ्या दहशतवाद्याशी बोलण्यात व्यस्त होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गाझामध्ये वाईट स्थिती! जखमींवरील उपचारात अडचण; डॉक्टर जमिनीवर करताहेत सर्जरी
गाझा शहरातील अल-अहली रुग्णालयावरील हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांवर उपचार करण्यात डॉक्टरांना अनेक अडचणी येत आहेत. वैद्यकीय साहित्याच्या कमतरतेमुळे त्यांना हॉस्पिटलच्या जमिनीवरच एनेस्थिसीया न देता जखमींवर सर्जरी करावी लागत आहे. इस्रायली बॉम्बफेक आणि परिसराची नाकेबंदी दरम्यान झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाजवळ आश्रय घेतलेल्या अनेकांचा मृत्यू झाला आहे.