इस्रायली सैन्याची कारवाई; गाझातील रुग्णालयावर हल्ला करत पकडले हमासचे 100 दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 08:49 PM2024-10-28T20:49:05+5:302024-10-28T20:49:24+5:30
Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्धाल एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. दरम्यान, आता हमासविरोधातील युद्धात इस्रायली लष्कराला मोठे यश मिळाले आहे. इस्रायली सुरक्षा दलांनी सोमवारी सांगितले की, इस्रायली सैनिकांनी उत्तर गाझा येथील कमल अडवान हॉस्पिटलमध्ये छापा मारताना सुमारे 100 संशयित हमास दहशतवाद्यांना पकडले आहे. पण, गाझा आरोग्य अधिकारी आणि हमासने रुग्णालयात दहशतवाद्यांची उपस्थिती नाकारली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी इस्रायली लष्कराने या रुग्णालयावर हल्ला केला होता.
“Hamas military operatives are present [in the Kamal Adwan Hospital]; they are in the courtyards, at the gates of the building, in the offices.”
— LTC Nadav Shoshani (@LTC_Shoshani) October 28, 2024
This ambulance driver—who was apprehended due to suspicion of terrorist involvement—reveals how Hamas uses the Kamal Adwan Hospital… pic.twitter.com/WTXdQ4aFtQ
इस्रायली लष्कराने सांगितले की, सैनिकांनी कंपाऊंडमधून सुमारे 100 दहशतवाद्यांना पकडले. याशिवाय सैन्याला रुग्णालयात मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दहशतवादी निधी आणि गुप्तचर दस्तऐवज सापडले आहेत.
Palestinian Health Ministry in Gaza says 43,000 Palestinians have been killed in yearlong war between Hamas and Israel, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) October 28, 2024
हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सध्या तरी युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून सुमारे 1200 इस्रायली नागरिकांची हत्या केली आणि 250 लोकांना ओलीस ठेवले. तेव्हापासून या युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे.