१२ दिवसांनंतर गाझामध्ये खाद्यपदार्थ पोहोचले, नेतन्याहूंनी बायडेन यांच्या आवाहनाला सहमती दिली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 07:17 AM2023-10-19T07:17:26+5:302023-10-19T07:22:54+5:30
गाझा रुग्णालयात झालेल्या स्फोटात ४७१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काल बुधवारी सलग १२ व्या दिवशीही सुरूच होते. दरम्यान, गाझा येथील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या हल्ल्यात ४७१ लोकांच्या मृत्यूला इस्रायल जबाबदार असल्याचा हमासचा दावा आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हॉस्पिटलमध्ये हा स्फोट हमासच्या रॉकेटमुळे झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन बुधवारी तेल अवीवमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्वतः विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांची बैठक झाली. यावेळी गाझा येथील रूग्णालयावर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला.
यावर बायडेन म्हणाले की, त्यांनी जे पाहिले आहे त्यावरून असे दिसते की, गाझा रुग्णालयात हा स्फोट इस्रायली सैन्याने नव्हे तर दुसर्या टीमने केला होता. यानंतर गाझा येथील रुग्णालयात झालेल्या स्फोटाला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
“इस्रायल एकटा नाही,” न्याय मिळाला पाहिजे. हमासच्या दहशतवाद्यांनी नरसंहार केला आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, गाझातील लोकांना अन्न, पाणी, औषध आणि निवारा हवा आहे. आज, मी इस्रायली कॅबिनेटला गाझा मधील नागरिकांना जीव वाचवणारी मानवतावादी मदत देण्यास सहमत होण्यास सांगितले. इस्रायलने मानवतावादी मदत इजिप्तमधून जाऊ देण्याचे मान्य केले आहे.
बायडेन म्हणाले की, मदत हमासला नाही तर नागरिकांकडे गेली पाहिजे. गाझामध्ये हमास निष्पाप लोकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहे. अमेरिका गाझा आणि वेस्ट बँकमध्ये राहणाऱ्या लोकांना १०० मिलियन दशलक्ष डॉलर्सचा निधी देईल. हे मानवतावादी मदत प्रदान करेल.
इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?
नेतन्याहू म्हणाले की, गाझामधील सामान्य लोकांसमोरील संकटाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने मानवतावादी मदत इजिप्तमध्ये जाण्यास परवानगी दिली जाईल. युद्ध सुरू झाल्यापासून गाझा पट्टीत राहणारे लाखो लोक अन्न, पेय, औषधे आणि विजेच्या संकटाचा सामना करत आहेत.