आधी गाझा, नंतर लेबनॉन आणि आता सीरियात बॉम्बफेक; इस्रायल-हमास युद्ध पश्चिम आशियात पसरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 07:54 AM2023-10-14T07:54:36+5:302023-10-14T07:55:33+5:30
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध वाढत आहे. सात दिवसांनंतर, इस्रायलने गाझाला पूर्णपणे वेढा घातला.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला सात दिवस पूर्ण झाले आहेत. दोन्ही देशांचे सैन्य बॉम्ब, शेल, क्षेपणास्त्रे आणि रॉकेटने सतत हल्ले करत आहेत. या युद्धासंदर्भात सध्या ज्या चर्चांना वेग आला आहे, जगातील आघाडीचे देशही उघडपणे पुढे येऊ लागले आहेत. अरब लीग देशांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थउतरले आहेत. इस्त्रायलच्या पाठीशी उभे असलेले देशही मोठ्या संख्येने आहेत. दरम्यान, दोन राज्यांच्या तोडग्यासह कराराबाबत इतर सूत्रांवरही चर्चा झाली. पण, सध्या तरी कोणताही निष्कर्ष निघताना दिसत नाही. अशा स्थितीत दोन्ही देशांमधील लढत आता तिसऱ्या महायुद्धाकडे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे हमासचा शेवटचा सैनिक मारले जाईपर्यंत हे युद्ध संपवणार असल्याचेही इस्रायलने स्पष्ट केले आहे.
भारतीय रेल्वेचं मोठ्ठं यश! EDFC चा मेगा प्रकल्प झाला पूर्ण, प्रवाशांना होणारा कमालीचा फायदा
पॅलेस्टाईनविरुद्ध रणांगणात उतरलेला इस्रायल वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहे. आधी ७ ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी समर्थक हमासच्या सैनिकांनी अचानक इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला. इस्रायली नागरिकांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचे अपहरण केले. नंतर इस्रायलने युद्ध घोषित केले आणि हमासला संपवण्यासाठी गाझा सीमेवर आपले सैन्य उतरवले. त्याचवेळी हमासच्या समर्थनार्थ लेबनॉनने इस्रायलवर बॉम्बफेक केली. पुढे इराण आणि सीरियाही इस्रायलच्या विरोधात घुसले. इस्रायली लष्कराने सीरियातील अलेप्पो आणि दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळांवर रॉकेट डागले आहेत. लेबनॉनही हमासला पाठिंबा देत आहे. हमासच्या सहकार्याने हिजबुल्लाहचे सैनिक इस्रायलवर हल्ले करत आहेत. दरम्यान, लेबनॉन आणि इस्रायलमध्ये प्रचंड तणाव आहे.
लेबनीज संघटना हिजबुल्लाहने इस्रायलवर मोर्टार डागले आहेत, याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्करानेही पवित्रा घेतला आहे. हे युद्ध आता मोठे होत असल्याचे बोलले जात आहे. कारण इस्रायलला दक्षिण-उत्तर सीमा आणि समुद्रालगतच्या भागातून शत्रूंचा सामना करावा लागतो. युद्धात हिजबुल्लाह आणि इराणच्या प्रवेशामुळे अडचणी वाढणार हे निश्चित आहे. कोणत्याही सरकारने हमासला उघडपणे पाठिंबा दिलेला नाही.
हा वाद लवकर सुटणार नाही'
वास्तविक, हा लढा फक्त दोन देशांपुरता मर्यादित नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये अमेरिकेसह इतर महासत्ताही उघडपणे पुढे येऊ लागल्या आहेत. ही परिस्थिती भविष्यात अनेक आव्हानांना जन्म देणार आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर जोरदार हल्ले केले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दोन्ही देशांच्या नेतृत्वाच्या भूमिकेवरून असे दिसते की, हे युद्ध लवकर सुटणार नाही, पण मित्र देशांनी पुढाकार घेऊन आपसातील मतभेद विसरून तडजोड करण्याचा प्रयत्न केला तर हे संकट निवळू शकते. संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि बहरीनने हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.