इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविराम करारावर शिक्कामोर्तब! पंतप्रधान कार्यालयाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:10 IST2025-01-17T11:09:11+5:302025-01-17T11:10:18+5:30

Israel Hamas War, ceasefire deal : ओलीसांच्या सुटकेसाठी झाला अंतिम करार, बोलणी करणाऱ्या टीमने दिली माहिती

Israel Hamas War gaza ceasefire hostage deal reached israel pm benajamin netanyahu office | इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविराम करारावर शिक्कामोर्तब! पंतप्रधान कार्यालयाची घोषणा

इस्रायल-हमास यांच्यातील युद्धविराम करारावर शिक्कामोर्तब! पंतप्रधान कार्यालयाची घोषणा

Israel Hamas War, ceasefire deal : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीबाबतचा करार निश्चित झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. पंतप्रधानबेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांच्या कार्यालयाने ही घोषणा केली आहे. इस्रायलच्यापंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, ओलीसांच्या सुटकेसाठी करार झाला आहे. करारावर बोलणी करणाऱ्या टीमने पंतप्रधान नेतन्याहू यांना याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी वाटाघाटी करणाऱ्या टीमचे आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान कार्यालय प्राधिकरणाने ओलिस आणि बेपत्ता लोकांच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या सुटकेची माहिती दिली आहे.

इस्रायलमध्ये येण्याबाबत पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ओलीस आणि बेपत्ता लोकांच्या सुटकेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले. या कराराला मंजुरी देण्यासाठी आज सरकारी बैठक होणार आहे. याआधी सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे.

बुधवारीच जाहीर झालेला युद्धविराम

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करार बुधवारीच जाहीर करण्यात आला. त्यावर दोघांनीही संमती दर्शवली होती. 19 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याची बातमी आली होती, मात्र काही अटींमुळे हा करार होऊ शकला नाही. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासवर करारातील तरतुदींपासून मागे हटल्याचा आरोप केला आहे. हमासला नव्या मागण्या सोडाव्या लागतील, असे ते म्हणाले. गाझामध्ये हमासला माघार घ्यावी लागेल. हमास वचन मोडत आहे. युद्धबंदी कराराची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इस्रायलने गाझावर हल्ला केला.

Web Title: Israel Hamas War gaza ceasefire hostage deal reached israel pm benajamin netanyahu office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.