गाझातील रुग्णालयावरील हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू; IDF नं सांगितलं, इस्लामिक जिहादचं रॉकेट मिसफायर झालं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 09:30 AM2023-10-18T09:30:35+5:302023-10-18T09:31:58+5:30
इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही.
इस्रारायल-हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंचे किमान 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यातच, इस्रायलने गाझातील एका रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा हमासने मंगळवारी रात्री उशिरा केला. या हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या या दाव्यानंतर, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही उत्तर दिले आहे.
इस्रारायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, संपूर्ण जगाला हे माहीत असायला हवे, की गाझामध्ये जो हल्ला झाला आहे, तो दहशतवाद्यांनी केला आहे, इस्रायली सैनिकांनी नाही. ज्या लोकांनी आमच्या मुलांच्या निर्घृन हत्या केल्या, ते त्यांच्या मुलांच्याही हत्या करत आहेत.
Prime Minister Benjamin Netanyahu, this evening:
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) October 17, 2023
"The entire world should know: It was barbaric terrorists in Gaza that attacked the hospital in Gaza, and not the IDF.
Those who brutally murdered our children also murder their own children."
रुग्णांलयावरील हल्ल्यासंदर्भात IDF -
तत्पूर्वी, यासंदर्भात माहिती देताना आयडीएफने म्हटले आहे, रुग्णालयावरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. शत्रूकडून इस्रायलवर अनेक रॉकेट लॉन्च करण्यात आले होते. यांपैकी एका अयशस्वी छरलेल्या रॉकेटने गाझातील या रुग्णालयाला निशाणा बनवले. आमच्याकडे असलेल्या गुप्त माहितीनुसार, रुग्णालयावर झालेल्या या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद जहशतवादी संघटना जबाबदार आहे.
Following an analysis by the IDF's operational systems, a barrage of rockets was launched toward Israel, which passed in the vicinity of the hospital, when it was hit.
— Israel Defense Forces (@IDF) October 17, 2023
According to intelligence information from a number of sources we have, Islamic Jihad terrorist organization is… pic.twitter.com/QZsanPaFEc
हा हवाई हल्ला मध्य गाझातील अल अहली रुग्णालयावर झाला. हे गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असल्याचे सांगण्यात जाते. इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री अल अहली अरबी बापटिस्ट रुग्णालयावर एअरस्ट्राइक केल्याचा दावा गाझा आरोग्य मंत्रालयाने केला होता. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर जखमी आणि इतर पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी आसरा घेतला होता.
I can confirm, that an analysis of the IDF operational systems indicates, that a barrage of rockets was fired by terrorists in Gaza, passing in close proximity to the Al-Ahli Al-Mahdi hospital in Gaza at the time it was hit >> pic.twitter.com/OcyuDHJGF8
— דובר צה״ל דניאל הגרי - Daniel Hagari (@IDFSpokesperson) October 17, 2023