हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 03:03 PM2023-10-12T15:03:40+5:302023-10-12T15:04:22+5:30

हमासच्या कमांडरला चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीने प्रक्षिक्षण दिल्याचे बोलले जात आहे.

Israel-Hamas War: Hamas terrorists attack Israel with 'Made in China' hang glider | हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला

हमासच्या दहशतवाद्यांनी 'मेड इन चायना' हँग ग्लायडरद्वारे केला इस्रायलवर हल्ला

Israel-Hamas War: शनिवारी(दि.7) पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना 'हमास'च्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर अचानक हल्ला केला. हमासने इस्रायलवर दोन ते तीन हजार रॉकेट डागले. यासाठी त्यांनी चीनमध्ये बनवलेल्या 'हँग ग्लायडर'चा वापर केल्याचा दावा इंटरनॅशनल प्रेस असोसिएशनच्या सदस्या आणि चिनी नागरिक असलेल्या जेनिफर झेंग यांनी X हँडलवरुन केला आहे. 

जेनिफर यांच्याकडे पक्की माहिती नाही की, हे ग्लायडर चीनमध्येच बनलेले आहेत. मात्र, चीनमधील काही नागरिकांनी, हे ग्लायडर्स हुनान प्रांतातील झुझोऊ येथे बनवल्याचे सांगत असल्याचा दावा जेनिफरने केला आहे. जेनिफरने याचा तपास करण्यासाठी झुझू येथील ग्लायडर फॅक्टरीच्या वेबसाइटवर पोहोचली, तिथे तिला तशाच प्रकारचे ग्लायडर दिसले.

या ट्विटपूर्वी आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे दावा केला होता की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे कार्यालय हमास आणि इराणच्या थेट संपर्कात आहे. तसेच हमास कमांडर मोहम्मद दायेफ, याला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने प्रशिक्षण दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. दाएफने चीनच्या शिजियाझुआंग शहरात असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ऑर्डनन्स इंजिनिअरिंग कॉलेजमधून प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला जात आहे. 

हल्ल्यापूर्वी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष चीनला गेले होते
1971 मध्ये संयुक्त राष्ट्रात सामील झाल्यानंतर चीनने इस्त्रायलने पॅलेस्टाईनच्या हद्दीतून बाहेर जावे, असे सातत्याने सांगितले आहे. 1988 मध्ये पॅलेस्टाईनला मान्यता देणारा चीन हा पहिला देश होता. एक वर्षानंतर, त्याने पॅलेस्टाईनशी संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. 1990 मध्ये चीनला विकसित देशांशी संबंध निर्माण करावे लागले, त्यानंतर त्यांनी सुधारणा आणि बाजारपेठेच्या आधारे इस्रायलशी संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली.
2023 मध्ये पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. 

Web Title: Israel-Hamas War: Hamas terrorists attack Israel with 'Made in China' hang glider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.