Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 01:31 PM2024-10-06T13:31:04+5:302024-10-06T14:03:56+5:30

मागील महिन्यात लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर आणि वॉकी-टॉकीच्या स्फोट प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे.

Israel-Hamas war Hezbollah made a mistake by trusting salesgirls There was a big ambush, Israel had been working on the pager for 10 years | Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते

Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते

१७ सप्टेंबरमध्ये लेबनॉनमध्ये पेजरमध्ये झालेल्या स्फोटाने फक्त लेबनॉनच नाहीतर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. या स्फोटात लेबनॉनचे मोठे नुकसान झाले. लेबनॉनमध्ये अचानक हजारो पेजर्सचा स्फोट होऊ लागले, यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. या पेजर हल्ल्यांनंतरच इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला होता. आता या पेजर हल्ल्यांबाबत आणखी एक खुलासा समोर आला आहे. इस्त्रायल पेजरवर २०१५ पासून काम करत होतं. वॉकीटॉकीच्या बॅटऱ्यांमध्ये स्फोटक साहित्य आणि पाळत ठेवणारी उपकरणे भरलेली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉनमध्ये १७ सप्टेंबर रोजी वापरल्या जाणाऱ्या वॉकी-टॉकीमध्ये बग करण्याचे नियोजन २०१५ च्या सुरुवातीलाच सुरू होते. लेबनॉनमध्ये पहिल्या टप्प्यात स्फोट झालेले पेजर आणि बीपर २०२२ मध्ये इस्रायलमध्ये बनवले होते आणि कंपनीच्या माहितीशिवाय ते शांतपणे अपोलो सप्लाय लाईनमध्ये मिसळले होते. 

"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले

सेल्सवुमनने पटवून दिले

यानंतर हिजबुल्लाहने पेजर खरेदी करायचे ठरवले. यावेळी त्यांना एका महिला सेल्समॅनने इस्त्राययला या पेजर-वॉकी टॉकीजवर नजर ठेवणे अशक्य आहे हे एका हिजबुल्लाला पटवून दिले होते, तेव्हा त्यांनी ५,००० खरेदी केले.

महिला हिजबुल्लाच्या संपर्कात होती, त्या महिलेने त्यांना समजावून सांगितले की, मोठ्या बॅटरीसह मोठे पेजर मूळ मॉडेलपेक्षा चांगले का आहे," इस्त्रायली अधिकाऱ्याने वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या ऑपरेशनच्या तपशीलांची माहिती दिली. हिजबुल्लाहने फेब्रुवारीमध्ये पेजर वितरीत करण्यास सुरुवात केली, पण हल्ल्याच्या एक दिवस आधी काहींचे वितरण करण्यात आले.

दहा वर्षापासून महत्वाचे ऑपरेशन लिक होत होते

काही दिवसापूर्वी रॉयटरने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात असे म्हटले होते की, लेबनॉनमध्ये दुसऱ्यांदा स्फोट झालेले पेजर आणि वॉकी-टॉकी जवळजवळ एक दशकापासून वापरात आहेत. वॉकी-टॉकीच्या बॅटरीमध्ये PETN नावाची अत्यंत स्फोटक  सामग्री आणि पाळत ठेवणारी उपकरणे होती. नऊ वर्षांपासून, इस्रायली गुप्तचर संस्थांनी हिजबुल्लाह ऑपरेशन्स ऐकण्यासाठी रेडिओचा वापर केला आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर करण्यासाठी प्रतीक्षा केली. 

'वरिष्ठ स्तरावरील इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्यांना योजनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी काही दिवसांपर्यंत काहीही माहिती नव्हती. देशाच्या उत्तरेकडील भागात संघर्षाचा धोका वाढत असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सर्वोच्च गुप्त योजना पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पेजरसह हिजबुल्लाह अधिकाऱ्यांना एक संदेश प्राप्त झाला की एक एनक्रिप्टेड संदेश येत आहे, यासाठी त्यांना दोन बटणे दाबणे आवश्यक होते, त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान होणार होते, असा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे. 

Web Title: Israel-Hamas war Hezbollah made a mistake by trusting salesgirls There was a big ambush, Israel had been working on the pager for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.