इस्रायलची मोठी कारवाई, 'हमास'च्या दिशेने सैन्य रवाना, 11 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 06:02 PM2023-10-13T18:02:24+5:302023-10-13T18:03:20+5:30

इस्रायलने पुढील 24 तासात गाझा पट्टीतील नागरिकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत.

israel-hamas-war-israel-army-plan-to-launch-land-attack-in-gaza-palestine | इस्रायलची मोठी कारवाई, 'हमास'च्या दिशेने सैन्य रवाना, 11 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश

इस्रायलची मोठी कारवाई, 'हमास'च्या दिशेने सैन्य रवाना, 11 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास, यांच्यात सुरू झालेल्या युद्धाने रौद्र रुप धारण केले आहे. पुढील 24 तासात इस्रायली सैन्य गाझावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ओलिस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठी इस्रायल हमासच्या ठिकाणांवर सर्वात मोठा हल्ला करणार आहे. यासाठी इस्रायलने पुढील 24 तासांत उत्तर गाझा पट्टीतून 11 लाख पॅलेस्टिनी नागरिकांना शहर सोडण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 

निम्म्या लोकांना बाहेर काढावे लागणार
संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, इस्रायलच्या हल्ल्यापूर्वी सूमारे अकरा लाख नागरिक (गाझाच्या संपूर्ण लोकसंख्येपैकी निम्मे) बाहेर काढावे लागतील.इस्रायली सैन्याने शहरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना दक्षिणेकडे गाझा पट्टीकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, इस्रायलने यापूर्वीच गाझाच्या 2.3 मिलियन लोकांचे अन्न-पाणी, इंधन आणि वीज पुरवठा बंद केला आहे. 

इस्रायलने सीमेवर सैन्य पाठवले 
इस्रायलने आपले उत्तर क्षेत्र मजबूत करण्यासाठी सीमेजवळील शहरांमध्ये सुरक्षा दल तैनात केले आहेत. सीमेवर पाच किलोमीटरच्या परिसरात विरळ लोकवस्ती आहे आणि बहुतांश व्यावसायिक सुविधा बंद आहेत. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीकडे 3 लाख सैनिकांची तैनाती केली आहे. आता हळुहळू टँकदेखील पाठवले जात आहेत. यावरुन युद्ध अटळ असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजवले जात आहेत. ही हल्ल्याची सूचना असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही तासात भीषण परिस्थिती पाहयला मिळू शकते.


 

Web Title: israel-hamas-war-israel-army-plan-to-launch-land-attack-in-gaza-palestine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.