हमासला पुरुन उरली इस्रायली महिला; एकटीने 25 दहशतवाद्यांना मारलं, सरकारनंही केलं कौतुक...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 09:02 PM2023-10-10T21:02:36+5:302023-10-10T21:03:26+5:30
या महिलेच्या शौर्यामुळेच हमासचे दहशतवादी तिच्या गावात घुसू शकले नाही.
Israel-Hamas War: शनिवारी अचानक हमासने इस्रायलवर एकापाठोपाठ एक शेकडो रॉकेट डागले. हा हल्ला इतका भीषण होता की, इस्रायलच्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, शेकडो लोकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोक सैरावैरा पळू लागले. यावेळी एक महिला घरोघरी जाऊन लोकांच्या हातात शस्त्रे देत होती. पुढे काय होणार, याची तिला चांगलीच कल्पना होती.
ये युवा महिला, इनबल लिबरमैन, निर-एम किबुत्ज़ सुरक्षा की प्रमुख है।
— Israel in India (@IsraelinIndia) October 10, 2023
हमास के आतंकवादी हमले के समय इन्होने तत्परता दिखाते हुए सभी महिलाओं और बच्चों को सुरक्षित स्थानों पर इकट्ठा किया और बहादुरी से लड़ते हुए 25 आतंकवादियों को मार गिराया।
इस वीरांगना कि वजह से पूरे किबुत्ज़ को बचा… pic.twitter.com/f8w8fZdVQs
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अनेक गावात जाऊन अत्याचार केले. पण, गाझा पट्टीतील किबुत्झ नीर आम गावात जाऊ शकले नाहीत. यावेळी गावात घुसणाऱ्या दहशतवाद्यांना या महिलेने एक-एक करत यमसदनी धाडले. गावाच्या रक्षणासाठी युद्धाच्या मैदानात उतरलेल्या इनबिल राबिन लिबरमन नावाच्या या महिलेने, गावात घुसणाऱ्या सुमारे 25 हमास दहशतवाद्यांना ठार केले. संपूर्ण इस्रायल तिच्या शौर्याचे कौतुक करत आहे.
इनबाल राबिनच्या शौर्याला सलाम
25 वर्षीय इनबाल राबिन लिबरमनच्या शौर्यामुळेच गाझा पट्टीतील हे एकमेव गाव आहे, जिथे हमासचे दहशतवादी घुसू शकले नाही. ट्विटरवर Israel in India नावाच्या अकाउंटवरुन या महिलेच्या शौर्याची माहिती देण्यात आली. सोशल मीडियावरही इनबालचे कौतुक होत आहे. अनेकांचे प्राण वाचवल्याबद्दल इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही इनबाल यांचे कौतुक केले आहे.