Israel Hamas war: वेस्ट बँकमध्ये इस्राइलची धाडसी कारवाई, हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:09 PM2023-10-14T13:09:14+5:302023-10-14T13:09:37+5:30

Israel-Hamas war: इस्राइलने वेस्ट बँक भागात जबरदस्त कारवाई करत हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले आहे. वेस्ट बँक आणि गाझासह अनेक ठिकाणी हमासविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे.

Israel-Hamas war: Israel's daring operation in the West Bank captures 230 Hamas terrorists | Israel Hamas war: वेस्ट बँकमध्ये इस्राइलची धाडसी कारवाई, हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले

Israel Hamas war: वेस्ट बँकमध्ये इस्राइलची धाडसी कारवाई, हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले

इस्राइलने वेस्ट बँक भागात जबरदस्त कारवाई करत हमासच्या २३० दहशतवाद्यांना पकडले आहे. वेस्ट बँक आणि गाझासह अनेक ठिकाणी हमासविरोधात लष्कराची कारवाई सुरू आहे. इस्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे इस्राइलनं दिलेलं २४ तासांचं अल्टिमेटम संपुष्टात आलं आहे. दहशतवाद्यांचा वावर असलेल्या परिसरात आयडीएफने छापेमारी केली आहे. या युद्दात इस्राइलच्या १३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हमासच्या हल्ल्यात ११ युक्रेनियन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. तसेच अनेक अमेरिकन नागरिकही बेपत्ता आहेत. हमासने १२० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे.

दुसरीकडे, इस्राइलने त्यांच्यावर करण्यात आलेला पांढऱ्या फॉस्फरसचा हल्ल्यासाठी वापर केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. वेस्ट बँकेमध्ये हमासच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. गाझाच्या समुद्रकिनाऱ्यावरही इस्राइलने हल्ला केला आहे. इस्राइलने उत्तर गाझामधील रुग्णालयेही रिकामी करण्याची सूचना दिली आहे.

दरम्यान, हल्ल्यासाठी सज्ज झालेले इस्राइलचे रणगाडे गाझामध्ये घुसले आहेत. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर छापेमारी केली जात आहे. हमासने आरोप केला की, इस्राइलच्या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, गाझाकडून लोकांचं पलायन सुरू आहे. हजारो लोकांनी घर सोडलं आहे. त्याशिवाय नेबल्समध्ये हमासच्या २ कमांडरांना पकडण्यात आलं आहे. आणि वेस्ट बँकमध्ये इस्राइली सैन्याची कारवाई सुरू आहे.

Web Title: Israel-Hamas war: Israel's daring operation in the West Bank captures 230 Hamas terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.