"गाझावरील हल्ल्यात आपल्याच लोकांना मारलं, आता इस्रायल मृतदेहही घेत नाही"; हमासचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 01:21 PM2023-11-30T13:21:46+5:302023-11-30T13:28:21+5:30

सात महिला आणि मुलांचे मृतदेह आणि गाझावरील बॉम्बहल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन जणांचे मृतदेह स्वीकारण्यास इस्रायलने नकार दिला आहे.

israel hamas war killed its own people in attack on gaza israel is not even taking dead bodies hamas alleged | "गाझावरील हल्ल्यात आपल्याच लोकांना मारलं, आता इस्रायल मृतदेहही घेत नाही"; हमासचा आरोप

"गाझावरील हल्ल्यात आपल्याच लोकांना मारलं, आता इस्रायल मृतदेहही घेत नाही"; हमासचा आरोप

इस्रायल आणि हमास यांच्यातील तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान ताब्यात घेतलेल्या सात महिला आणि मुलांचे मृतदेह आणि गाझावरील बॉम्बहल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन जणांचे मृतदेह स्वीकारण्यास इस्रायलने नकार दिला आहे. गेल्या सहा दिवसांप्रमाणे आज, गुरुवारी तात्पुरता युद्धविराम वाढवल्यानंतर कैदी आणि ओलीस यांची देवाणघेवाण होणार होती. मात्र इस्रायलने तीन कैद्यांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप हमासने केला आहे. 

हमासने दिलेल्या माहितीनुसार, ही संख्या त्याच श्रेणीतील कैद्यांची आहे ज्यावर सहमती झाली होती. मध्यस्थांनी याला दुजोरा दिल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यात सुमारे 240 ओलिसांना पकडलं आणि युद्धाची ठिणगी पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, केफिर बिबास हा केवळ नऊ महिन्यांचा होता, जेव्हा त्याला 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमधील त्याच्या घरातून हमासच्या सैनिकांनी पकडले होते. अचानक झालेल्या हल्ल्यात त्याची आई आणि चार वर्षांच्या भावालाही ओलीस ठेवण्यात आले होते. हमासने बुधवारी सांगितले की गाझामध्ये इस्रायली बॉम्बफेकीमुळे तिघं ठार झाले, परंतु इस्रायली सैन्याने सांगितलं की ते दाव्याची चौकशी करत आहेत.

इस्रायली संरक्षण दलाने एका निवेदनात म्हटले आहे की ते माहितीच्या सत्यतेचे मूल्यांकन करत आहेत. इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतील सर्व ओलिसांच्या सुरक्षेची जबाबदारी हमासची आहे. हमासच्या कृतींमुळे नऊ मुलांसह ओलिसांना धोका आहे असं म्हटलं आहे. 

हमासने दावा केला होता की, युद्धविराम लागू होण्याच्या काही दिवस आधी केफिर, त्याचा भाऊ एरियल आणि त्याची आई शिरी इस्त्रायली बॉम्बहल्ल्यात मारले गेले होते. मुलाच्या वयामुळे, 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या हल्ल्यात पकडण्यात आलेल्या हाय प्रोफाइल ओलिसांमध्ये बिबास कुटुंबाचा समावेश होता. 
 

Web Title: israel hamas war killed its own people in attack on gaza israel is not even taking dead bodies hamas alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.