सैनिकाच्या आईच्या जिद्दीला सलाम; सर्व काही विकून युद्धग्रस्त इस्रायलमध्ये होतेय शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 02:41 PM2023-10-17T14:41:16+5:302023-10-17T14:49:53+5:30

Israel Palestine Conflict : न्यूयॉर्कमधील एक महिला सर्व काही विकून इस्रायलमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे.

israel hamas war newyork mother of idf son sells belongings to move to israel says they needs us | सैनिकाच्या आईच्या जिद्दीला सलाम; सर्व काही विकून युद्धग्रस्त इस्रायलमध्ये होतेय शिफ्ट

फोटो- Elana Kirschbaum

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यामुळे इस्रायलमधील परिस्थिती गंभीर आहे. इस्रायलवर हमासच्या अचानक हल्ल्याने युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्याने इस्रायलला धक्का बसला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडून सततच्या बॉम्बहल्ल्यांमुळे 20 लाख लोकसंख्या असलेला गाझा इमारती आता कब्रस्तानात बदलू लागल्या आहेत.

न्यूयॉर्कमधील एक महिला सर्व काही विकून इस्रायलमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहे. एलाना किर्शबाम या 53 वर्षीय माजी स्पेशल एज्युकेशन टीचर आणि इस्रायल संरक्षण दलातील सैनिकाची आई आहे. त्या न्यूयॉर्कच्या फॉरेस्ट हिल्समध्ये राहतात. इस्रायलला जाण्यासाठी त्या सध्या आपलं सामान विकत आहे. यावेळी इस्रायलला आपल्या सर्वांची गरज आहे असं म्हणतात. या युद्धात 1,300 इस्रायली लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 3,000 इस्रायली जखमी झाले आहेत.

"मला माझ्या मुलाच्या जवळ राहायचे आहे, आणि मला इस्रायलमधील ज्यू लोकांसोबतही राहायचे आहे" असं किर्शबामन यांनी द पोस्टला सांगितलं. "मी इस्रायलला जात आहे, पण मला तिथे राहण्यासाठी पैशांची गरज आहे. आता तिथे कोणीच काम करत नाही. सर्व शाळा बंद असल्यामुळे ते शिक्षकांची भरती करत नाहीत. म्हणून मी माझ्या मालकीचे सर्व काही विकून पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे" असं महिलेने म्हटलं आहे. 

सर्व काही ऑनलाइन विकण्याच्या Kirschbaum च्या निर्णयाचे लोक समर्थन करत आहेत. लोक इतरांनाही त्यांच्या मालमत्तेच्या विक्रीला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत. या मालमत्तेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्राचीन आहेत आणि आयुष्यभराच्या आठवणी ठेवतात.

ऑनलाईन पोस्ट केलेल्या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, "किर्शबाम तिच्या दुसऱ्या मायदेशात, इस्रायलमध्ये जाण्यासाठी तिच्या घरातील वस्तू विकत आहे, त्यामुळे ती सध्या इस्रायली सैन्यात सेवा करत असलेल्या तिच्या मुलाच्या जवळ जाऊ शकते. तिच्याकडे काही प्राचीन वस्तू आहेत आणि ती त्या विकत आहे. जर तुम्ही त्याला पाठिंबा देऊ शकत असाल तर त्वरा करा." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: israel hamas war newyork mother of idf son sells belongings to move to israel says they needs us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.